images 10
Crime Maharashtra

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी आणखी एकाला अटक

अमरावती- वन अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अखेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. निलंबित अप्पर मुख्य प्रधान सचिव श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातली ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे विनोद शिवकुमार यांच्यासह निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांनीही अटक करण्यात यावी अशी मागणी जोर धरली होती. अखेर तपासाअंती धारणी पोलिसांनी श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. धारणी पोलिसांनी आज गुरुवारी पहाटे रेड्डी यांना अटक केली आहे.

कोरोनामुळे काँग्रेसचे नेते राजीव सातव यांची प्रकृती चिंतादायक

           दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येच्या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे दखल घेतली होती. त्यानंतर मार्च महिन्यात या प्रकरणात मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक आणि  अप्पर प्रधान सचिव श्रीनिवास रेड्डी यांना लेखी खुलासा आयोगाने मागावला होता. तसंच, पदावरून हटवण्यात आले होते. या प्रकरणी सर्वात आधी 25 मार्च रोजी DFO विनोद शिवकुमार यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा 306 नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

नेमके काय आहे हे प्रकरण पहा

अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हरीसाल क्षेत्रात कार्यरत RFO (परिक्षेत्र अधिकारी) दीपाली चव्हाण यांनी 25 मार्च रोजी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली होती.  मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्य जीव परीक्षेत्रात त्या गेल्या दीड वर्षापासून वनपरिक्षेत्र अधिकारी या पदावर कार्यरत होत्या. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. दीपाली चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर तिची सुसाईड नोट पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी विनोद शिवकुमारला अटक केली होती.

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com