Solapur City

बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी- चेंबर ऑफ कॉमर्स

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- सोलापुरातील बिगर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने गेल्या दीड महिन्यापासून कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेस प्रतिबंधक करण्याकरता महाराष्ट्र शासनाच्या वतीने 6 एप्रिल 2021 पासून सोलापूर शहरातील बाजारपेठा, दुकाने, यंत्रमाग कारखाने, गारमेंट, विडी कारखाने आदि सुरु ठेवण्याकरिता तसेच रोजगार टिकवण्याकरता लवकरात लवकर सुरू करणे गरजेचे आहे. शहरातील कोरोना positive दर कमी झाला आहे व डब्लिंगचे दिवस सुद्धा वाढलेले आहेत तसेच रुग्णांची संख्या शहरात कमी होत आहे व कोरोना असेच राहणार आहे. हया सर्व बाबींचा सारासार विचार करून कोरोनासहितच व्यवहार व जनजीवन सुरू ठेवणे गरजेचे आहे या सर्व बाबी जवळपास सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरू आहे फक्त बिगर अत्यावश्यक वस्तूंची दुकाने बंद आहे यामुळे मोठे आर्थिक नुकसान व्यापारांना सहन करावे लागत आहे. सर्व खर्च, दुकान भाडे, लाईट बिल, बँकांचे कर्जावरील व्याज,विम्याचे हप्ते, शासनाचे कर, मिळकत कर आदि खर्च थांबणार नाही. गेल्या वर्षीची लग्नसराई लाॅकडाउनमध्ये गेली.

आणखी एका क्रिकेटपटूचा कोरोना मुळे मृत्यू

                यावर्षी सुद्धा या प्रदीर्घ लाॅकडाऊनमुळे सिझन रामनवमी,गुढीपाडवा, रमजान ईद, लग्नसराई सर्वात मोठा मुहूर्त अक्षय तृतीया हे सर्व लाॅकडाउन बंद मध्येच गेले. या सर्व बाबींचा वेळोवेळी माननीयांना सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरच्यावतीने अध्यक्ष राजू राठी मानद सचिव धवल शहा व पदाधिकारी संचालकांनी निदर्शनास आणून दिलेले आहे. तरी सर्व बाबींचा विचार करून माननीय शासनाकडे प्रस्ताव पाठवून आमच्या मागणीचा सकारात्मक विचार करावे ही विनंती करण्यात आली.व्यांपाऱ्याचे व उद्योजगजकांचे प्रश्न अध्यक्ष राजू राठी यांनी सर्व अडचणी मांडल्या. सिंधि समाजाचे अध्यक्ष मोहन सचदेव मागणी ठेवल्या. व्यापारी सदर निवेदन मा. आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचन यन्नम, विरोधी पक्षनेते श्रीनिवास करली, नगरसेवक शिवानंद पाटील, संजय कोळी, नागेश भोगडे, आदींच्या उपस्थितीत माननीय आयुक्त पी शिवशंकर यांना सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरच्यावतीने अध्यक्ष राजू राठी संचालक ताराचंद आहुजा, इंदरलाल होतवाणी, शंकरशेठ होतवानी सिंधी समाजाचे अध्यक्ष मोहन सचदेव व्यापारी धनराज आनंदानी राजू राजानी, मुकेश आहूजा आदीच्या उपस्थितीत देण्यात आले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com