demands of assistants positively
Fund Maharashtra

हजेरी सहाय्यकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- हजेरी सहायकांच्या पेन्शनसह विविध मागण्यासंदर्भात सकारात्मक विचार करणार असल्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले. मंत्रालयात रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांविषयी विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, किसन कथोरे, माजी आमदार विजय गव्हाणे, रोजगार हमी योजना विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार, नरेगा आयुक्त शंतनु गोयल, जालना जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हे वाचा- नागपूर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे सुरू करा

                        या बैठकीत रोजगार सहायकांच्या सेवानिवृत्ती, शासकीय सेवेत नियमित करणे, रूजू झालेल्या तारखेपासून सेवा गृहीत धरावे, अशा विविध मागण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शक्य असणाऱ्या मागण्यांवर लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. काही विषय न्यायप्रविष्ट असल्याचेही भुमरे यांनी यावेळी सांगितले. सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी पुरवठा उपलब्ध व्हावा. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा. यासाठी दोन विहीरीमधील अंतर कमी करण्यासाठी अभ्यास गट समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे भुमरे यांनी सांगितले. यावेळी रोजगार हमी योजना अंतर्गत करण्यात येणाऱ्या जालना, बीड, नांदेड या जिल्ह्यातील कामांचा रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांसाठी संबंधित अधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून शेतकऱ्यांना कामे उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश भुमरे यांनी दिले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143