Health

होमीओपॅथी डॉक्टर्सच्या मागण्यांबाबत सकारात्मक

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई-  होमीओपॅथी डॉक्टर्स ग्रामीण आरोग्य सेवेतील महत्त्वाचे घटक असून त्यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यातील होमीओपॅथी डॉक्टरांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी होमीओपॅथी डॉक्टरांना आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकांमध्ये नियुक्ती देणे, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नियुक्त केलेल्या होमीओपॅथी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करणे, समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती देणे आदी विषयासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी आयुषचे संचालक डॉ.कोहली, आरोग्य सहसंचालक डॉ.विजय कंदेवाड, होमीओपॅथी संघटनेच्या डॉ.रजनी इंदूलकर, डॉ.बाहुबली शहा आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. मध्यप्रदेश आणि राजस्थानप्रमाणे 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकांमध्ये होमीओपॅथी डॉक्टरांची सेवा देण्याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली. यासंदर्भात आरोग्य आयुक्तालयाने ज्या बाबींची शिफारस केली आहे त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. समुदाय आरोग्य अधिकारीपदी नियुक्ती देण्यासाठी केंद्र शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात येईल. त्याचबरोबर वेतनातील तफावत दूर करण्याबाबतही केंद्र शासनाकडे मागणी केली जाईल, असे टोपे यांनी सांगितले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143