Maharashtra Solapur City निधन वार्ता

दुःखद बातमी | प्रभाग 3 मधिल इंदिरा वसाहत भागात डेंग्यूने 9 महिन्याच्या बालिकेचा घेतला बळी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- पावसाळ्याच्या दिवसांत संसर्गजन्य आजारांच्या प्रमाणात वाढ होताना दिसते. तर आता राज्यासह सोलापूर शहरात डेंग्यूच्या आजारांनी डोकं वर काढल्याचं दिसून येत आहे. या आजाराचा प्रादूर्भाव शहरात वाढत असून डेंग्यूने भवानी पेठेतील इंदिरा वसाहत भागातील निवेदिता दासरी या नऊ महिन्याच्या लहान मुलीचा बळी घेतला आहे.

Dengu solapur

पाच दिवसांपासून मार्कंडेय रुग्णालयात उपचार सुरू असताना आज शुक्रवारी सायंकाळच्या वेळी लहान मुलीला प्राण गमवावे लागले. डेंग्यूचे सर्वाधिक प्रादुर्भाव वाढत असून शहरात मात्र मनपाच्या वतीने कोणतेही ठोस पावले व उपाययोजना करत नसल्याचे दिसून आले आहे. शहरात विविध ठिकाणी वेळेत कचरा न उचलणे, पावसाळ्यात अनेक भागात पाणी दाबक्यासारखे जमा झाले आहे. पाणीपुरवठा विस्कळीत व पाणीपुरवठा 3 ते 4 दिवसाने होत असल्यामुळे अनेक नागरिक मिळेल त्या भांड्यात पाणी साठवून ठेवत असतात. अनेकदा स्वच्छता न केल्यामुळे डेंग्यू सारखे साथीचे रोग पसरत जात आहेत. अनेक ठिकाणी प्रादुर्भाव वाढत असताना मात्र पालिकेकडून अद्याप कोणतेच पावले न उचलल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी आता तरी प्रशासन जागे होईल का याकडे पाहणे गरजेचे आहे. 

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com