Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम व माझी वसुंधरा अभियान सोलापूर महानगरपालिका सोलापूर अंतर्गत जनहित
दिनांक 03/11/2022 रोजी पंढरपूर शहरात कार्तिक वारी अनुषंगे अन्न व औषध प्रशासन, सोलापूर या कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री. प्रशांत कुचेकर, श्री. उमेश भुसे व नमुना सहाय्यक श्रीशैल हिटनल्ली यांनी गोपनीय माहितीच्या आधारे काळा मारुती चौक , पंढरपूर येथील हिम्मत गणू चौगुले व बाबू दादा माने दोघे रा. कवठेमहाकाळ, जि. सांगली तसेच फरार अनोळखी 08 इसम यांनी विक्रीस आणलेल्या पेढ्याचा संशय आल्याने सदर पेढ्यात जागेवर आयोडीन टाकून पाहिले असता सदर पेढ्यात स्टार्च या अन्न पदार्थाची भेसळ असल्याचे आढळून आले. त्यामुळे सदर भेसळयुक्त पेढ्याचा एकूण 300 किलो, किं. रु. 72,000/- चा साठा जप्त करुन सदर पेढा भेसळ युक्त असल्याने जागेवर नष्ट करण्यात आला. सदर प्रकरणी भा द वी कलम 272, 34 नुसार एकूण 10 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पंढरपूर शहर पोलिस स्टेशन येथे चालू आहे. तरी अन्न व औषध प्रशासन यांनी सर्व स्वछ,निर्भेळ व भेसळविरहित अन्न पदार्थ विक्रीस उपलब्ध करावे असे आवाहन केले आहे .
सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. प्रदिपकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्री. प्रशांत कुचेकर, श्री. यु. एस. भुसे, व नमुना सहाय्यक श्रीशैल हिटनल्ली यांच्या पथकाने पुर्ण केली.
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143