Economy

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या कुटुंबिअ‍ॅयांचे सांत्वन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सातारा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे ज्येष्ठ नेते व माजी सहकारमंत्री स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.  यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली व विलासकाका पाटील उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील व कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी कराडचे तहसिलदार अमरदीप वाकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित पाटील, तालुका पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे तसेच गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143