Fund Solapur City

वीरशैव व्हीजनतर्फे 100 निराधार आणि विधवा कुटुंबांना प्रत्येकी हजार रुपये मदतनिधी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- कोरोनामुळे आज समाजातील प्रत्येक घटक अडचणीत आला आहे. सध्याच्या काळात अनेकांना चरितार्थ चालवणे मुश्कील बनले आहे. अशा कठीण परिस्थितीत गरजूंना आधार देणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे असे प्रतिपादन जनता सहकारी बँकेच्या संचालिका चंद्रिका चव्हाण यांनी केले. वीरशैव व्हीजनने कोरोनामुळे जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीवर होणारा खर्च टाळून गरीब, गरजू, निराधार आणि विधवा अशा 100 कुटुंबियांना प्रत्येकी रोख 1 हजार रुपये मदतनिधी देण्याच्या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.

                    याप्रसंगी मंचावर महानगरपालिकेचे नूतन सभागृह नेता शिवानंद पाटील, सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे सरव्यवस्थापक डॉ. विजयकुमार भडंगे, वीरशैव साबळे ट्रस्टचे अध्यक्ष सिद्धाराम साबळे, नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, आझाद हिंद नवरात्र मंडळाचे अध्यक्ष शशिकांत पाटील, वीरशैव व्हीजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव अध्यक्ष सोमेश्वर याबाजी उपस्थित होते. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 5 महिलांना प्रत्येकी रोख 1 हजार रुपये देऊन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. उर्वरित 95 कुटुंबियांना घरी जाऊन ही मदत देण्यात येणार आहे. यावेळी बोलताना शिवानंद पाटील म्हणाले की वीरशैव व्हीजन एक वेगळं व्हीजन घेऊन समाजाला सद्यस्थितीत आवश्यक असणारे अनेक उपक्रम राबवित आहे. अशा सामाजिक संस्थांमुळे समाजाची घडी टिकून आहे. वीरशैव व्हीजनतर्फे बसव जयंती निमित्त प्रतीवर्षी बसव व्याख्यानमाला व तर सामाजिक, शैक्षणिक स्पर्धात्मक कार्यक्रम बसव सप्ताहांतर्गत आयोजित करण्यात येतात. यंदा कोरोनामुळे बसवजयंती निमित्त आयोजित बसव व्याख्यानमाला व बसव सप्ताह रद्द करण्यात आला आहे.

                    यंदा महापालिकेच्या साबळे प्रसूतिगृह येथे 4 पंखे देण्यात आले. शेळगी येथील महापालिकेच्या दवाखान्यास 10 हजार पॅरासिटॅमॉल गोळ्या देण्यात आल्या. गेल्यावर्षीही 150 महिलांना रोख 1 हजार रुपये प्रमाणे दीड लाख रुपये मदत करण्यात आल्याचे वीरशैव व्हीजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी सांगितले. याप्रसंगी नागेश बडदाळ, विजयकुमार बिराजदार, चिदानंद मुस्तारे, गंगाधर झुरळे, अमित कलशेट्टी, सचिन विभुते, सोमनाथ चौधरी, अविनाश हत्तरकी, सिद्धेश्वर कोरे, चेतन लिगाडे, रामचंद्र राजमाने, विनोद घंटे उपस्थित होते

डावीकडून वीरशैव व्हीजनतर्फे मदतनिधी देताना चंद्रिका चव्हाण, शिवानंद पाटील, प्रभाकर जामगुंडे, डॉ विजयकुमार भडंगे, सिद्धाराम साबळे, शशिकांत पाटील, सोमेश्वर याबाजी, सोमनाथ चौधरी

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com