Economy

लवकरच बारामतीच्या धर्तीवर अमरावतीचा विकास करू

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

अमरावती-  परिपूर्ण विकासकामांनी बारामतीला नावाजले जाते. त्यानुसार बारामतीच्या धर्तीवर अमरावती जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करू, असे प्रतिपादन पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी आज जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी केले. जिल्ह्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी त्या बोलत होत्या. खासदार नवनीत राणा, माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार प्रताप अडसड, पंचायत समिती सभापती पूजाताई आमले, सदस्य कल्पना ढवळे, अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा आदी यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते. श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकासात रस्ते निर्मिती महत्वपूर्ण घटक आहे.त्यामुळे रस्त्यांच्या सुधारणेची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करून विहीत मुदतीत ही कामे पूर्ण करावीत, दर्जेदार रस्ते व इतर पायाभूत सुविधा निर्माण करून विकासाला गती देण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे. रस्ते हे देशाच्या रक्त वाहिन्या आहेत, रस्ते निर्मितीतून उद्योग, व्यवसायाला चालना मिळून त्या त्या जिल्ह्याचा विकास होत असतो. त्यामुळे रस्त्यांच्या सुधारणेची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करून विहीत मुदतीत ही कामे पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले. अपूर्ण असलेली कामे वेगाने पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जात असून, नवीन कामेही हाती घेण्यात येत आहेत, असेही त्या म्हणाल्या.

 अच्युत महाराज विकास आराखडा

अच्युत महाराज यांच्या कर्मभूमी असलेल्या शेंदूरजना बाजार व परिसराचे सर्वांगीण विकास होण्यासाठी अच्युत महाराज यांच्या नावाने विकास आराखडा तयार करण्यात येणार अशी घोषणा पालकमंत्री यांनी यावेळी केली. आशियाई विकास बँकेच्या सहकार्यातून तिवसा- कुऱ्हा-अंजनसिंगी- धामणगाव रेल्वे- देवगाव- यवतमाळ रस्त्याच्या सुधारणा कामांचे, रिद्धपुर-तिवसा रस्ता, नेरपिंगळाई व रिद्धपुर येथील रिद्धपुर-तिवसा रस्ता आदी रस्ता सुधारणा कामांचे भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. निधी अभावी जिल्ह्यातील रस्ते विकासाचे काम संथ गतीने होत होते. परंतु आता आशियाई विकास बँकेच्या यांच्या सहकार्यामुळे रस्ते बांधकाम पूर्णत्वास जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मंजूर झालेल्या नऊ प्रकल्पापैकी तीन प्रकल्प अमरावती होणार आहेत. रस्ते निर्मिती व पुलांची दुरुस्ती अंतर्गत 420 किमी लांबीपैकी 320 किमी लांबीचे काम बांधकाम विभागाद्वारे पूर्ण होणार आहेत. यानंतरही या रस्त्याची 5 वर्षच्या दुरुस्ती व देखभाल चे काम सुद्धा संबंधित यंत्रणेला दिले आहे. इंडियन रोड स्टॅण्डर्ड नुसार निर्माणाधिन रस्त्याची रुंदी 10 मीटर असनार. योजने अंतर्गत जिल्ह्यातील जे पूल नादुरुस्त त्याची नव्याने उभारणी करण्यात येणार आहे. या रस्ते निर्मितीतून सुमारे १६५ किमी लांबीचे रस्ते  काम पूर्ण होणार आहेत, अशी माहिती अधीक्षक अभियंता श्रीमती शर्मा यांनी प्रास्ताविकातून दिली.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143