Maharashtra Gov School & Collage

कौशल्य विकास परीक्षा मंडळाच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी संस्था, व्यवस्थापनांनी अर्ज करण्याचे आवाहन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेले प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्याकरिता इच्छुक संस्था, व्यवस्थापनांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज जमा करण्याचा कालावधी नियमित शुल्कासह ३० मार्च २०२१ पर्यंत (शासकीय सुट्ट्या वगळून) आहे, तर विलंब शुल्कासह १ ते १५ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करता येईल. मान्यता मिळण्याबाबतची कार्यपद्धती, नियमावली आणि अटी व शर्ती तसेच विविध व्यवसाय अभ्यासक्रम व विविध शुल्कांबाबतची माहिती मंडळाच्या माहितीपुस्तिकेत उपलब्ध करण्यात आली आहे. अर्ज व माहितीपुस्तिका महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ, वांद्रे, मुंबई यांच्या http://www.msbsde.edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक नोंदणीकृत संस्था, व्यवस्थापन यांनी ऑनलाईन अर्ज भरुन त्याची प्रिंट काढून परिपूर्ण महिती भरलेला अर्ज व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे, चलन (अर्ज रक्कम व प्रक्रिया शुल्क रकमेचे) इत्यादी संबंधीत जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाकडे विहीत मुदतीत जमा करावयाचे आहेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. मान्यता प्रक्रिया पूर्ण करणेबाबतची माहिती मंडळाच्या माहितीपुस्तिकेमध्ये देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा मंडळाच्या http://www.msbsde.edu.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी केले आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143