devotional-auspicious-atmosphere
Religious Solapur City

भवानी पेठ येथील जेमिनी मातेचे सुवर्ण महोत्सवानिमित्त शक्ती देवीची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या भक्तीमय व मंगलमय वातावरणात संपन्न

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर – घोंगडे वस्ती परिसरातील भवानी पेठ येथील जमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेची स्थापना 1971 साली करण्यात आले यंदाच्या वर्षी जेमिनी मातेचे पन्नासाव्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून नवीन शक्ती देवी मातेचे मूर्ती प्रतिष्ठापना बुधवारी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मोठ्या भक्तीमय व मंगलमय धार्मिक विधीने आई राजा उदो सदानंदीचा उदो उदो.च्या गजरात करण्यात आले. दरम्यान बुधवारी पहाटे जुन्या शक्ती देवीची विधिवत पूजन करून विसर्जन करण्यात आले तसेच बुधवारी सकाळी नवीन शक्ती मातेचे मूर्तीची होटगी मठाचे मठाधिपती धर्मरत्न डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी आणि शिवयोगी महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात हदेवीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. दरम्यान या प्राणप्रतिष्ठा निमित्त मंदिरात होमहवन नवग्रह पूजा रुद्राभिषेक महापूजा आदीं धार्मिक विधीने मोठ्या भक्तीमय व मंगलमय वातावरणात संपन्न झाले सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून शक्ती देवीची प्राणप्रतिष्ठापना नंतर दुपारी शक्ती देवीची महाआरती नंतर देवी भक्तांसाठी महाप्रसाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. घोंगडे वस्ती आणि भवानी पेठ येथील हजारो भक्तांचे आराध्यदैवत असणाऱ्या जेमिनी मातेचे यंदाचे हे 50 वे वर्ष आहे त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे माहिती मंडळाचे आधारस्तंभ भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा नगरसेवक सुरेश पाटील यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनीदेखील यावेळी उपस्थिती दर्शविली खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांचे स्वागत व सत्कार नगरसेवक सुरेश पाटील यांनी केले माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी यावेळी जेमिनी मातेचे दर्शन घेतले. यावेळी होटगी मठाचे मठाधिपती धर्मरत्न डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते आमदार विजयकुमार देशमुख यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विकास जाटगल उपाध्यक्ष बसलींगप्पा करली सागर हल्संगी मल्लू कोळी शिवानंद मंदकल सिद्राम तेग्गेळी शरणाप्पा डोळे सिद्राम पुराणिक नरसप्पा मदकल बंडोपंत डोळे सुरेश गोरकल अप्पू उंडागळे पांडुरंग कैरमकोंडा बिपिन भैय्या पाटील प्रवीण कैरमकोंडा शिवलिंग कोळी विजय कोळी महेश गोरकल राहुल संकाराम प्रभू कोळी महेश मणूरे आदींसह या भागातील देवी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान कोरोना महामारी चे सर्व नियम पाळीत हे संपूर्ण कार्यक्रम पार पडला कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी संस्थेच्या वतीने दक्षता घेण्यात आली होती मोठ्या भक्तीमय मंगलमय वातावरणात जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेचा 50 वा सुवर्ण महोत्सव संपन्न झाला.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143