Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
उस्मानाबाद- धाराशिव साखर साखर कारखाना लि. युनिट१ चोराखळी, उस्मानाबादच्या कारखान्याच्या ८व्या गळीत हंगामातील २ लाख ११ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन शेतकऱ्यांच्या मुलांच्या हस्ते व सर्व संचालकांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. ऊस कारखान्यास आल्यास गव्हाणीपासून ते साखर निर्मिती पर्यंत सगळी प्रकिया शेतकऱ्यांच्या मुलांना दाखवली. जो शेतकरी तळहाताच्या फोडाप्रमाणे आपला ऊस जपून कारखाना जगवतो, त्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या हस्ते पोती पुजन करताना मनस्वी आनंद झाला. त्यांना कधीच मान सन्मानाची अपेक्षा नसते. परंतू शेतकऱ्यांच्या मुलांनी कारखाना जवळून पाहावा यातील सर्व गोष्टी ज्ञात व्हावे म्हणून केलेला प्रयत्न आहे. गळीत हंगामाची यशस्वी वाटचाल सुरू असताना कारखाना हंगाम सुरळीत व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अधिकारी, कर्मचारी, प्रशासन, तोडणी-वाहतूक हंगामात प्रतिदिन जास्तीत जास्त ऊसाचे गळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या हंगामातील कामगिरी बद्दल सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार यांचे अभिनंदन केले.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143