Maharashtra शेतकरी

शेतकऱ्यांसमोर हुकूमशहा झुकला, बळीराजा जिंकला- प्रकाश वाले

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

केंद्रातील मोदी सरकारकडुन शेतकरीविरोधी तीन जुलमी कृषी कायदे मागे
सोलापूर- शेतकरी आणि कॉंग्रेस पक्षाच्या विरोधामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी विरोधी तिन्ही जुलमी वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली म्हणून सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा समोर शेतकऱ्यांचे अभिनंदन करत पेढे वाटून आनंद साजरा केले.

सिमेंट उद्योग व सिमेंटवर आधारित उद्योगातील कामगारांच्या किमान वेतनासाठी समिती गठित करणार
यावेळी बोलताना सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले की, गेल्या दीड वर्षांपासून शेतकरी दिल्ली बार्डरवर व देशभर शेतकरी विरोधी जुलमी कृषी कायदे मागे घेण्यासाठी आंदोलन करत आहेत त्यांना कॉंग्रेस पक्षाने, देश आणि राज्यभरात कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी, प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांनी पाठिंबा देऊन शेतकरी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवुन तसेच कृषी कायदे मागे घेण्यासाठी दोन कोटी स्वाक्षरी मोहीम कॉंग्रेस पक्षाने घेतला होता या शेतकऱ्यांच्या आणि कॉंग्रेस पक्षाच्या आंदोलनाला यश येऊन आज रोजी केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी विरोधी तीन जुलमी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. हा आंदोलक शेतकऱ्यांचा विजय असून त्यांचे अभिनंदन करतो. हा बळीराजा शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय असून शेतकऱ्यांसमोर हुकूमशहा मोदी सरकारला झुकावे लागले. ऊन, वारा, पाऊस, थंडी याची तमा न बाळगता गेल्या दीड वर्षांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या या जिद्दीला सलाम करतो, तसेच या आंदोलनात शेकडो शेतकरी शाहिद झाले त्यांच्या कुटुंबियांना योग्य ती मदत मिळावी अशी अपेक्षा करतो.
यावेळी माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, प्रदेश सचिव अलकाताई राठोड, पश्चिम महाराष्ट्र यंग ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष सुदीप चाकोते, माजी महापौर आरिफ शेख, नगरसेवक शिवा बाटलीवाला, सेवादल अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, बसवराज म्हेत्रे, अनिल मस्के, VD गायकवाड, रामसिंग आंबेवाले, आप्पासाहेब बगले, सुनील व्हटकर, हारून शेख, रुस्तुम कंपली, मन्सूर गांधी, नूर अहमद नालवार, प्रमिला तुपलवंडे, चंद्रकांत टिक्के, परशुराम सत्तारेवाले, राजेश झंपले, पुरुषोत्तम श्रीगादी, मोनिका पवार, सागर शहा, चांदाताई काळे, श्रीकांत दासरी, शफी इनामदार, मनोहर माचरला, सत्यनारायण संगा, राकेश मंथेंन, मेघश्याम गौडा, सागर शहा, सोमनाथ व्हटकर, पंडितबुवा गणेशकर, शोहेब कडेचुर, धीरज खंदारे, राजकुमार हिरेमठ, अनिता भालेराव, यांच्यासह इतर पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com