fbpx
Digital Bank system of banks

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सातारा Digital Bank  –  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त देशातील 75 डिजिटल बँकींग युनिटची स्थापना करण्यात आली असून यामध्ये सातारा येथील बँक ऑफ महाराष्ट्रचाही समावेश आहे. डिजीटल कार्यप्रणालीचे लोकार्पण दूरदृष्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सितारामण उपस्थित होत्या. तर पायोनिर टॉवर, सातारा येथून खासदार धनंजय महाडीक, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एस. राजीव, अंचल प्रबंधक विवेक नाचणे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक युवराज पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्रांची संख्या झाली कमी

                    Digital Bank डिजीटल बँकेतील अधिकारी हे ग्राहकांना डिजिटल व्यवहार कसे करावे याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये ग्राहकांना अनेक सुविधा देण्यात येणार आहेत. Digital Bank  तसेच वित्तीय साक्षरता, डिजीटल व्यवहार, ऑनलाईन फसवणूक होणार नाही याचेही ग्राहकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. Digital Bank  तसेच ग्राहकांच्या शंकांचेही निरासण करण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 जिल्हृयातील 75 डिजिटल बँक करण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर, औरंगाबाद तसेच सातारा येथील बॅक ऑफ महाराष्ट्रचा समावेश आहे. या डिजिटील बँकींगमुळे आर्थिक सक्षमीकरणाला चालना, डिजिटल बँकीग साक्षरता होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

Corona Live Update