Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
नागपूर Digital Media – टेक्नोविजन मीडिया ॲण्ड कम्युनिकेशनच्या माध्यमातून प्रकाशित होऊ घातलेल्या देवनाथ गंडाटे लिखित “डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने” या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा अनावरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल
Digital Media नागपुरातील वनामती सभागृहात आयोजित छोटेखाणी कार्यक्रमात डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रीव्हन्स कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विधिज्ज्ञ अॅड. फिरदोस मिर्झा, तरुण भारत डिजिटलचे संपादक शैलेश पांडे, उच्च न्यायालयाचे एडवोकेट आनंद देशपांडे, डॉ. कल्याणकुमार, वरिष्ठ पत्रकार आनंद आंबेकर उपस्थित होते. डिजिटल मीडिया आणि सोशल मीडिया माध्यमातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकातून माहिती व तंत्रज्ञानाची सुलभतेने ओळख होईल, अशा शुभेच्छा राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी दिल्या. यावेळी सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनीही कौतुक केले.
यावेळी विदर्भातून विविध जिल्ह्यातून आलेल्या Digital Media डिजिटल मीडिया प्रतिनिधींची उपस्थिती होती. Digital Media या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचे टेक्नोविजन मीडिया ॲण्ड कम्युनिकेशनचे व्यवस्थापकीय संचालक आनंद आंबेकर यांनी सांगितले.
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143