Maharashtra Solapur City

सर्व घटकांचा निराशा करणारा अर्थसंकल्पः आ. सुभाष देशमुख

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- राज्याने मांडलेला अर्थसंकल्प शेतकरी, तरूण आणि महिला वर्ग, आणि कामगारांचा म्हणजेच सर्व घटकांचा निराशा करणारा आहे. शेतकर्यांना अतिवृष्टीचे नुकसान म्हणून तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. विजेची बिले या सरकारने वाढवून दिली आणि त्यात आता 50 टक्के सूट दिली आहे. त्यामुळे याचा काही ङ्गायदा होणार नाही. या उलट सुधारित विजे बिल करून त्यात सवलत देणे आवश्यक होते. दुसरीकडे केंद्र सरकारच रेल्वे, पाणी पुरवठा, राष्ट्रीय महामार्गाला केंद्रच पैसे देते. त्याच योजना या अर्थसंकल्पात सादर केल्या आहेत. एकीकडे केंद्र सरकार काही देत नाही म्हणून ओरडायचे आणि आता त्यांच्याच योजनांवर अर्थ संकल्प वाटला आहे. तरूणांच्या रोजगारासाठी केंद्राचीच योजना राबवण्याचे धोरण या सरकारने आखले आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात नवे असे काही नसून सर्व घटकांची या अर्थसंकल्पाने निराशा केली आहे, असे आ. सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143