discriminate in development work: MLA
Solapur City Fund

विकासकामे करताना भेदभाव करणार नाही: आमदार सुभाष देशमुख

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

डोणगाव- तेलगाव रस्त्याचे भूमिपूजन

सोलापूर- जनतेने आपल्याला कामे करण्यासाठी निवडून दिले आहे. त्यामुळे विकासाची कामे करताना कोणताही भेदभाव केला नाही आणि करणारही नाही, असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.  2 कोटी 50 लाखांच्या डोणगाव तेलगाव रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन डोणगाव येथे  आ. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बाजार समिती संचालक आप्पासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम, डोणगावचे सरपंच संजय भोसले, तेलगावचे सरपंच रेवणसिद्ध पुजारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

हे वाचा– प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजप युवा मोर्चा सोलापूर शहर सदस्य नोंदणी अभियान व सोलापूर शहर उत्तर नव मतदार नाव नोंदी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसादन

                 आमदार देशमुख पुढे म्हणाले की, आत्तापर्यंत कधीही न झालेली कामे गेल्या पाच ते सहा वर्षांत दक्षिण आणि उत्तर तालुक्यात झालेली आहेत. जनतेच्या सेवेची कामे करताना आपण कधीही पक्ष, गट तट पाहिलेले नाही. तालुक्याचा विकास हेच ध्येय ठेवून काम केले आहे आणि यापुढेही करणार आहे. यावेळी भाजपा महिला तालुका अध्यक्ष जयश्री चौगुले, उपअभियंता बांधकाम विभाग जेऊरकर, विशाल जाधव, नागनाथ बचुटे, विकास पाटील, बाबा आमले, रेवणसिद्ध खजुरकर, ज्ञानेश्वर बंडगर,  व डोणगाव व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143