Solapur City

विस्कळीत पाणीपुरवठ्याची दखल घेत पालिका आयुक्तांनी केली प्रभाग 3 ची पाहणी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

निकृष्ट दर्जेच्या कामाची नगरसेवकांनी ओढले ताशेरे
सोलापूर- सोलापूर शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना शहरामध्ये स्मार्टसिटी व अमृत योजनेमार्फत रस्ते खोदाई काम सुरू आहे. अनेकदा खोदाई करताना पाण्याची लाईन फुटून लाखो लिटर वाया गेल्याने पुढील पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने शुक्रवारी सायंकाळी नगरसेवक सुरेश पाटील व बिपीन पाटील यांनी पालिका आयुक्तांच्या दालनात आंदोलन केले होते. जोपर्यंत मक्तेदारावर कारवाई होत नाही तो पर्यंत आंदोलन करू असा इशारा सुरेश पाटील यांनी दिला होता. पालिका आयुक्ता पी शिवशंकर यांना सदर माहिती कळताच शनिवारी सर्व अधिकाऱ्यांसमवेत कुंभारवेस व विश्रांती चौक येथे पाहणीसाठी दाखल झाले. अमृत योजना व स्मार्ट सिटीच्या निकृष्ठ कामामुळे सोलापूर शहरवासीयांना याचा त्रास होत असल्याचे पाटील यांनी आयुक्तांना निदर्शनास आणून दिले. गोलचावडी दवाखाना ते कुंभार वेस ते रुपाभवानी मंदिर चौकाची पाहणी करत त्यामार्गात झालेल्या चुका व नुकसानीबाबत नगरसेवकांनी आयुक्तांना तक्रार केले. पालिका आयुक्त भवानी पेठेत भेट देणार असे समजताच संबंधित स्मार्ट सिटी अधिकारी व अमृतयोजनेचे अधिकारी, संबंधित मक्तेदार व संजय धनशेट्टी, माशाळे, पांढरे, मेरगु, जाधव, बडवे व सर्वखातेप्रमुख याप्रसंगी भेट दिले. याप्रसंगी प्रभागाचे नगरसेवक सुरेश पाटील, नगरसेवक संजय कोळी, संदिप पाटील, विजय कोळी, चंद्रकात मुंडे, महेश मल्लुरे, नागेश पुजारी, विजय गोरकल, लिंगराज पाटील, अक्षय पाटील, जे ई. मुंडे, अंजली कोने सह आदी ब परिसर परिसरातील नागरिक उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143