Maharashtra

लोकमंगल फाऊंडेशनतर्फे दीड हजार गोरगरिबांना अन्नधान्य वाटप

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- रिलायन्स आणि लोकमंगल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गोरगरीब, कष्टकरी आणि विडी कामगारांना अन्नधान्याचे कीट वाटप करण्यात येत आहे. याचे उद्घाटन बुधवारी पत्रकार अजित उंब्रजकर, विजय गायकवाड आणि आरती कुसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे संचालक सुनील गुंड यांची उपस्थिती होती. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे कष्टकरी, मजूर आणि विडी कामगारांचे हाल होत आहेत. त्यामुळे सामाजिक बांधलकी म्हणून आ. सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रिलायन्स आणि लोकमंगल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सुमारे दीड हजार कुटुंबांना अन्नधान्याचे कीट वाटण्यात येणार आहेत. याचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. विनायक नगर, निलम नगरासह विविध भागातील विडी कामगारांना कुपनद्वारे धान्याचे वाटप करण्यात येणार आहे. एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून रोज 200 कुटुंबांना धान्य वाटप होणार आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com