Fund

पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते शहीद कुटूंबीयांना धनादेशाचे वितरण

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

बुलडाणा- जिल्ह्यातील शहीद जवान सतिष सुरेश पेहरे रा. अमोना पो. शेलगांव आटोळ ता. चिखली हे पुर्व लद्दाख गलवान घाटी, जम्मू काश्मिर येथे १४ जुलै २०२० रोजी शहीद झाले. या शहीद जवानच्या कुटूंबियांना राज्य शासनाच्यावतीने १ कोटी रूपयांच्या आर्थिक मदत जाहीर झाली. या मदतीचा धनादेश आज राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री ना. डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या दालनात देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, सहा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान,  सोनटक्के आदी उपस्थित होते. शहीद जवान सतिष पेहरे यांच्या कुटूंबीयांमध्ये 60 लक्ष रूपयांचा धनादेश वीरपत्नी श्रीमती जया सतिष पेहरे, वीरमाता श्रीमती अलका सुरेश पेहरे यांना 20 लक्ष रूपये, वरपिता सुरेश छोटीराम पेहरे यांना 20 लक्ष रूपयांचा धनादेश देण्यात आला.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143