Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- अवंती नगर येथील लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेत नवलबाई आदिनाथ बोंदार्डे यांच्या हस्ते 50 गरीब लोकांना अन्नधान्याची किट वाटप करण्यात आले. लोकमंगल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गोरगरीब, कष्टकरी आणि विडी कामगारांना अन्नधान्याचे कीट वाटप करण्यात येत आहे.
हे वाचा- मंद्रूप एम.आय.डी.सी. जागा भूसंपादनाबाबत बैठक लावण्याचे आदेश
लोकमंगलचा हा उपक्रम पाहून नवलबाई बोंदार्डे यांनीही यात सहभाग नोंदवला आहे. त्यांनी 350 धान्य किट गरिबांना वाटण्यासाठी लोकमंगलकडे सुपूर्द केले आहेत.सोमवारी त्यांच्याच हस्ते किट वाटप करण्यात आले. यावेळी शाखेचे सल्लागार उत्तमराव हुंडेकर, शाखाधिकारी महिबुबी शेख व कर्मचारी उपस्थित होते.
#solapurcitynews