Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- नगरसेवक नागेश वल्याळ व महर्षि मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक श्री.निरंजन बोध्दूल यांच्या संयुक्त विद्यमाने गतवर्षी कोरोनामुळे खंडित झालेला नवरात्रीतील ब्रतुकम्मा उत्सव पूर्व भागातील पद्मशाली व तेलुगू भाषिक महिलांनी ब्रतुकम्माच्या भक्तीगीतांवर फेर धरीत अत्यंत श्रध्देने व प्रचंड उत्साहात महापौर सौ.श्रीकांचना यन्नम यांच्या प्रमुख उपस्थितीत व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत श्री मार्कंडेय उद्यानात पार पडला. गेल्या ४ वर्षापासून नगरसेवक नागेश वल्याळ हे या कार्यक्रमाचे आयोजन करीत होते.
यंदा महर्षि मार्कंडेय जन्मोत्सव महामंडळानेसुध्दा या आयोजनात योगदान दिले असून या उत्सवात भाग घेतलेल्या महिलांना वल्याळ परिवाराच्यावतीने साडी वाटप व उत्कृष्ट ब्रतुकम्मा सजावटीसाठी चाटला प्याटनी तर्फे पैठणी बक्षीस नगरसेवक धुत्तरगावकर यांच्या हस्ते देण्यात आली. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागेश सरगम, भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष जयंत होले पाटील ,सुकुमार सिध्दम,दत्तू पोसा, दत्ता पाटील सर, अनिल वंगारी, महामंडळाचे अनिल वासम, पद्मप्रिया बलमेरी सौ.माधवी अंदे,सौ.पुष्पनीला रच्चा,नागार्जून चिलवेरी, नरेश दाते,शावर कोंडा, गणेश नामा, तनिष्क वल्याळ, सतिश चिटमिल आदींनी परिश्रम घेतले.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143