Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
242 नागरिकांनी घेतले शिबिराचे लाभ
सोलापूर Travel pass – राज्य सरकारने दिलेल्या नव्या सूचनांनुसार महाराष्ट्रात प्रवासासाठी युनिव्हर्सल पास सोबत बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या सूचनेनुसार शनिवारी सिध्दसंग प्रतिष्ठानच्या वतीने मोफत युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास कार्ड शिबीर प्रविण प्रकाश वाले यांच्या तर्फे पास चे वाटप करण्यात आले. शनिवारी प्रकाश वाले यांच्या संपर्क कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रभाग 8 मध्ये मोफत युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास कार्ड शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण प्रभागातील 242 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतल्याची माहिती प्रविण वाले यांनी दिले. या शिबिराचे उदघाटन काँग्रेस शहर अध्यक्ष प्रकाश वाले, शिवानंद बुगडे, नागेश हिंगमिरे, प्रविण वाले, केदार मेंगाणे, गौरीशंकर वाले यांच्या हस्ते नागरिकांना वाटप करण्यात आले.
राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा
जनतेच्या सेवेसाठी आम्ही मोफत युनिव्हर्सल Travel pass पासचे वाटप करत आहोत. कोरोना काळात अनेकांना बेड मिळवून देणे व इतर सर्वतोपरी मदत केले आहे. तसेच प्रभागातील नागरिकांच्या अडचणीसाठी आम्ही सदैव तत्पर असून यंदा महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यानंतर जनतेची सगळी अडचणी दूर करणार असल्याची माहिती प्रकाश वाले यांनी दिली. लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना सदर युनिव्हर्सल पास बनवून घेता येणार आहे. सार्वजनिक प्रवासासाठी तसेच मॉल्स, सिनेमा गृह इत्यादी ठिकाणी प्रवेशासाठी सदर पास सक्तीने लागणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी युवासेने मार्फत युनिव्हर्सल पास बनवून घ्यावी असे आव्हान प्रविण वाले यांनी केले आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी निलेश मसरे, सागर दीक्षित, शंकर मसरे, शिवा वाले, अविराज वाले, सोमा शिवशेट्टी, गणेश कळके, समर्थ रेशमे, किरण वाले, विशाल मुस्के, अमित शिरशी, ईश्वर हिंगमीरे, कौशिक वाले, ओंकार राजमाने, गौरीश कुंभार, श्रीशैल बिराजदार आणि प्रविण वाले मित्र परिवारासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews