Fund Maharashtra

योग्य नियोजन करुन जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करावा- वर्षा गायकवाड

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

हिंगोली- जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण योजनेंतर्गत  सन 2021-22 या वर्षासाठी प्राप्त झालेला निधी योग्य नियोजन करुन जिल्ह्यातील विकास कामांवर वेळेत खर्च करावा, अशा सूचना राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत पालकमंत्री श्रीमती गायकवाड बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, खासदार हेमंत पाटील, सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकूळे, राजू नवघरे, संतोष बांगर, विप्लव बाजोरिया, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

           यावेळी पालकमंत्री श्रीमती गायकवाड म्हणाल्या की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची बाधा लहान मुलांना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेचा व डेल्टा, डेल्टा प्लस या विषाणूंचा सामना करण्यासाठी चालू वर्षाचा 12 कोटीचा निधी आरोग्य विभागाला उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या निधीतून जिल्हा प्रशासनाने व आरोग्य विभागांनी योग्य नियोजन करुन बेडची व्यवस्था, औषधी, व्हेंटिलेटर आदी सुविधा तयार कराव्यात. जनतेनी खबरदारी घेण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करावी. सध्या जिल्ह्यात लेव्हल तीनचे इंटेसिव पेडियाट्रिक केअर युनिट व 20 खाटांचे एनआयसीयू तयार करण्यात आले आहे. तसेच 25 स्वतंत्र व्हेंटीलेटर्स, 124 खाटांचे एस.एन.सी.यू उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्समध्ये समावेश करावा. लसीकरणाची मोहिम राबवावी. लस उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्राला प्रस्ताव पाठविण्यात आला असून याबाबत पाठपुरावा सुरु आहे. याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सहभाग घेऊन जास्तीत-जास्त लसीकरण करण्यासाठी पाठपुरावा करावा, असे आवाहन करुन  तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सज्ज राहावे, अशा सूचना दिल्या. आरोग्य विभागाची पदभरतीस स्थगिती असल्यामुळे पदभरती केली नाही. याबाबत पालकमंत्री यांनी आरोग्य मंत्र्यांना भेटून पदभरतीचा प्रश्न सोडवण्यात येईल, असे सांगितले. तसेच डायलेसीसची संख्या वाढवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि मंजूर झालेले आयुष महाविद्यालय सुरु करण्यासाठी जमीन उपलब्ध करुन दिली असुन, तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या केंद्राच्या मंजूरीबाबत आपण सर्व लोकप्रतिनिधीनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा करुन प्रयत्न करावेत, असे त्यांनी यावेळी सांगितले . जिल्ह्यातील शाळांच्या इमारती धोकादायक झाल्या असून त्याचे नूतनीकरण करण्यासाठी राज्याकडून मराठवाड्यासाठी 72 कोटीचा निधी मिळणार असून उपलब्ध निधीतून ज्या शाळाचे निविदा प्रक्रिया व कार्यारंभ आदेश देण्यात आलेल्या आहेत. त्या शाळा पूर्ण कराव्यात व जिल्ह्यातील उर्वरित शाळा खोल्याचे बांधकाम जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने बैठका घेऊन प्राधान्यक्रम ठरवून करावेत, अशा सूचना  यावेळी पालकमंत्री श्रीमती गायकवाड यांनी दिल्या.

हे वाचा- सिंचन आणि विकासाच्या बाबतीत सावली तालुका अग्रेसर करणार- विजय वडेट्टीवार

                  समिती सदस्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे देयक भरुनही वीज पुरवठा सुरु होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. यावर पालकमंत्री यानी या प्रश्नी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यक्तीश: लक्ष घालून सदर वीज पुरवठ्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा. ग्रामीण भागात वारंवार रोहित्र बंद होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असुन ते वेळेवर दुरुस्त करुन मिळत नसल्याच्या तसेच वीज देयकाअभावी वीज पुरवठा खंडित करण्याच्या  महावितरणच्या तक्रारी प्राप्त होत असल्याची तक्रारी समिती सदस्यांनी केली. शाळेवर लोंबकाळणाऱ्या धोकादायक तारा तात्काळ दुरुस्त दुरुस्त कराव्यात. तसेच बंद पडलेल्या सौर पंपाबाबत काहीही कार्यवाही होत नसल्याच्या तक्रारी होत्या. यावर पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्याची चौकशी लावावी, अशा सूचना दिल्या. तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्राची कामे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बैठक घेऊन 8 दिवसाच्या आत मार्गी लावावेत, अशा सूचना केल्या. तसेच ग्रामपंचायतीच्या ओपन जिमचा तसेच वसमत व कळमनुरी येथील क्रीडा संकुलाचा प्रश्न चर्चा करुन सोडवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच पाणंद रस्त्याबाबत सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर पालकमंत्री महोदयांनी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन तात्काळ मार्गी लावाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या. तसेच जिल्हा क्रीडा संकुलाचे दूरुस्तीचे काम तात्काळ पूर्ण करुन ते जनतेसाठी खुले करावे, अशा सूचना ही श्रीमती गायकवाड यांनी दिल्या.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com