fbpx
satara1 1024x486 1 पात्र लाभार्थ्यांना घरे देऊन जिल्ह्याचे १०० टक्के उद्दिष्टे पूर्ण करुया – पालकमंत्री बाळासाहेब पाटील
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सातारा- महाआवास अभियान –  ग्रामीण हे  28 फेब्रुवारी 2021 अखेर राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेंतर्गत गरजूंना  गुणवत्तापूर्ण व दर्जेदार घरे उपलब्ध करुन देण्यासाठी हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून पात्र लाभार्थ्यांना घरे देऊन जिल्ह्याचे 100 टक्के उद्दिष्टे पूर्ण करण्याचे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केले.

              येथील जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात आज महा आवास अभियान-ग्रामीण जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाज कल्याण सभापती कल्पना खाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अविनाश फडतरे आदी उपस्थित होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आवास योजनांची कामे रखडली आहेत, या कामांना महा आवास अभियानांतर्गत गती द्यावी, असे सांगून पालकमंत्री श्री.पाटील पुढे म्हणाले, शहराजवळ असलेल्या गावांमध्ये घरकुल योजनेंतर्गत जमिनी खरेदी करण्यास अडचणी येत आहेत. यावर मार्ग काढला पाहिजे. घरकुल योजना राबविण्यास अडचणी येत असतील तर त्या सर्व विभागांनी एकत्र बसून सोडविल्या पाहिजेत. घरकुल योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्यासाठी नियोजन करा. यामध्ये सरपंच, पंचायत सभापती, सदस्य यांचा समावेश करावा. मंजूर व अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न असून राज्य व केंद्र पुरस्कृत घरकुल योजना राबविण्यासाठी राज्य शासन पाठीशी आहे. महा आवास अभियान-ग्रामीण जिल्ह्यात यशस्वी राबवा, असेही आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी कार्यशाळेत केले.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM पात्र लाभार्थ्यांना घरे देऊन जिल्ह्याचे १०० टक्के उद्दिष्टे पूर्ण करुया – पालकमंत्री बाळासाहेब पाटीलडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update