Maharashtra Blog Solapur City

दिवाळी विशेष लेख – नजरेने टिपलेले पहिलं प्रेम

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

रविवारचा सुटीचा दिवस होता. त्यामुळे सगळं कसं निवांत शांत होत…. कालच माझी बहीण (नेहा) आली होती तिचा शेवटचा पेपर होता. त्यामुळे मी ( निशा)  तिला राहण्याचा आग्रह केला.  पेपर चांगला गेल्यामुळे नेहा पण खुश होती.

तेवढ्यात बाहेरची बेल वाजली मी नेहाला म्हणाले, बघ पहा बाहेर  कोण आले ते…. ती रूम झाडत होती हातात झाडू तसाच होता…. तरी तिने दार उघडला…तिच्या समोर अवि म्हणजे माझ्या नंदेचा भाचा उभा होता.

 ते दोघे एकमेकांकडे पाहतच राहिले मी म्हणाले,  अरे अवि आत ये  ना….. तसा तो …एकदम बावरला..आणि आत आला.  माझी बहीण नेहा स्वयंपाक घरात निघून गेली… ती  बाहेर आलीच नाही. मी अविला विचारले कसं काय?… अचानक आलासं..!!! तो म्हणाला..  मी मावशीकडे आलोय ..थोडे दिवस राहणार आहे. 

माझी बहीण नेहा स्वयपाक घरातचं थांबली. अवि थोडा वेळ बसून निघून गेला.  काहीना- काही निमित्त काढून अवि  सतत माझ्या घरी येत होता. आणि अवि आणि नेहाची नजरानजर होत होती… त्याची मावशी हिला शंका येत होती… हा रोज का चाललय मामीकडे….??? 

एके दिवशी त्याच्या बरोबर मावशी आली…नेहा आणि अविचा अबोल प्रीतीचा लपंडाव तिने पाहिला…जे समजायचे ते तिने समजले…. नंतर जेव्हा अवि माझ्याकडे यायचा… तेव्हा माझी नणंद त्याची मावशी त्याच्याबरोबर असायची… रोज दोघांना पाहून काही ना काही चेष्टा मस्करी करायची…. तशी नेहा एकटीच रूम मध्ये बसायची… एकदा तर मावशीने कहरच केला. तिने नेहाला  हाताला धरून स्वतः जवळ बसवले आणि नेहा व अविला  तिरक्या नजरेने पाहून म्हणते कशी …वहिनी मी.. ना… माझ्या अविला गरीब घराण्यातली, साधी-भोळी, खांद्यावर पदर घेणारी, मिस्कील हसणारी, गालावर गुलाबी छटा असणारी, अशी मुलगी करणार आहे…बर… तशी नेहा नाराज झाली व पुन्हा रूममध्ये झटकन निघून गेली…थोड्या वेळातच तो मावशी बरोबर घरी निघून गेला…

 

नेहा म्हणाली..मी जाते बर कशी आता दादाकडे…मला नाही राहायचं इथे….मी म्हणाले असं कसं करू नकोस….  रहा थोडे दिवस…  उद्या नोकरी लागल्यावर परत तू येणार आहेस का? … मी तिला बळेच ठेवून घेतले…नंदेचे नाटक चालूचं होते …. अविचे आई-वडील, भाऊ हे पण थोडे दिवस राहून गेले… झाला प्रकार माझ्या बहिणीला म्हणजे नेहाला कळेना…. ती त्वरित दादाकडे निघून गेली. व  तिने घडलेले वृत्तांत तिने दादाला सांगितला… तेव्हा दादा तर भलताच चिडला होता… मी ताईला पत्र लिहून जाब विचारतो असे म्हणाला…

 परंतु नेहाने आडवले जाऊ दे, ताईला बोलून काही उपयोग…. ती तर सासुरवाशीन आहे.. काही दिवसांने वहिनी ची तब्येत बरी नव्हती म्हणून दादाकडे माहेरी आले. माझा दादा नाराज होता त्याला वाटत होते की नेहाची  बाजू घेऊन तिने तिच्या नंदेशी बोलायचे होते की, चेष्टा-मस्करी थांबवा.. कारण दोघेही तरुण आहेत.  हा काय बाहुला-बाहुलीचा  खेळ नाही, मन दुखावली जातात. कोंबडा- कोंबडीला दाणे टाकून खेळ पाहणे बरोबर नाही. हा आयुष्याचा प्रश्न असतो.. मग मी मान्य केले खरंच दादा तुझे बरोबर आहे….

परंतु ऐक ना दादा.. खरंच अविच्या मनात प्रेम होते नेहा बद्दल… मी अविला विचारले सुद्धा …की तू लग्नासाठी मुली पहायला आला आहेस तर सुरुवात केली का नाहीस का …. उगाच वेळ वाया घालवतोस…तसा तो म्हणाला मला तर मुलगी पसंत आहे….. तेव्हा मी म्हणाले… अरे कोणती  मुलगी रे…. मला तर वंन्सने काहीच बोलले  नाही.. त्यावर तो म्हणाला …अजून मावशीला मी काय बोललो नाही…मग बोल ना ….कोण आहे ती मुलगी..??..त्यावर तो उत्तरला… तुमचीच बहिण नेहा…!!!

मी आवाकच…झाले…ते कसे शक्य आहे…का नाही…मला तर ती पसंद आहे…अरे तिच्या उजव्या हातावर हरभराच्या डाळी एवढा पांढरा डाग आहे… तेव्हा तो म्हणाला मला सर्व माहित आहे…हे सर्व अंगावर होणार आहे.. हे ही मला माहित आहे… मला हे प्रकरण थोडं गंभीर वाटले…

 मी त्वरित नंदेला सांगितले त्यावर ती अवि घरी आल्यावर वीज कडकडते तशी कडाडली… मी चेष्टा-मस्करी करत होते… तू खरंच समजलास…!!! 

तिला कोड आहे उद्या सर्व अंगभर होईल… अवि म्हणाला मला माहित आहे…. तरीही ती मला पसंत आहे… तेव्हा तिने अविच्या आई-वडिलांना सांगून लगेच तडका-फडकी दुसऱ्या मुली पाहायला सांगून… त्याचे लग्न तडका-फडकी करून टाकले. तो मनातून खूपच दुखावला… परंतु सर्वांच्या मनाविरुद्ध जावून लग्न केले असते तर रोष पत्करावा लागला असता व संसार पण नीट झाला नसता… त्यामुळे अविने मौन भूमिका पत्करली…मला कळतयं त्याचंही मन दुखावलं… आणि नेहाचं मन दुखावलं गेलं…

 

 कारण मी पाहिले त्यांचं नजरेने टिपलेलं पहिले प्रेम…. मी हे सांगत असताना नेहा दाराच्या आडून हे सगळ ऐकत होती … मला अपराधी असल्यासारखं वाटलं… मला पुन्हा म्हणावसं वाटलं नजरेन टिपलेल पहिलं प्रेम…!!!

स्वलिखित: श्रीमती आशा चंद्रकांत कुमणे, सोलापूर.

मोबाईल: ९३२५५१८६७७

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com