Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे प्रमुख राज ठाकरे यांचे सर्वात लाडका श्वान ‘जेम्स’ चे निधन झाले आहे. आज मनसे प्रमुखांनी त्याला पूर्ण आदराने अखेरचा निरोप दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेम्स राज यांच्या कुटुंबासोबत गेल्या 12 वर्षांपासून राहत होता. ‘जेम्स’ला अखेरचा निरोप देताना मनसे प्रमुख आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य दुःखी दिसत होते. जेम्सला अंतिम निरोप देण्यासाठी राज ठाकरे यांच्या मुंबई निवासस्थानी पक्षाचे काही नेते आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास ‘जेम्स’चा मृत्यू झाला. काही वेळापूर्वी परळच्या स्मशानभूमीत जेम्सवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
‘जेम्स’ राज ठाकरे यांच्या खुप जवळ होता
राज ठाकरे आणि ‘जेम्स’ ची छायाचित्रे बर्याचदा सोशल मीडियावर व्हायरल व्हायची. राज ठाकरे यांचे आपला लाडका श्वान जेम्स यांच्यावरील प्रेम या छायाचित्रांमधून बर्याचदा पाहिले जाऊ शकते. घरात पक्षाच्या बैठकीत जेम्स राज ठाकरेसमवेत बर्याच वेळा दिसायचा.
#solapurcitynews
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com