fbpx
dpdc-basic-facilities-in-the-distric

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम व माझी वसुंधरा अभियान सोलापूर महानगरपालिका सोलापूर अंतर्गत जनहित

धुळे DPDC-  जिल्हा वार्षिक योजनेत राज्य शासनाने धुळे जिल्ह्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीच्या विनियोगाचे कालबद्ध नियोजन करीत जिल्ह्यातील मूलभूत सेवा-सुविधांचे बळकटीकरण करावे. उपलब्ध निधी मार्च 2023 अखेर शंभर टक्के खर्च होईल, असे नियोजन करताना कामांचा दर्जा उत्कृष्ट राहील याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी येथे दिले.

महाराष्ट्रात सायबर इंटिलिजन्स युनिट उभारणार

              जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात DPDC जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री श्री. महाजन हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. अश्विनी पवार, खासदार डॉ. हिनाताई गावित, जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस., पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, महानगरपालिका आयुक्त देवीदास टेकाळे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, उपवनसंरक्षक नितीन सिंग, परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी सत्यम गांधी, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आदी उपस्थित होते.

      पालकमंत्री महाजन म्हणाले, DPDC जिल्हा वार्षिक योजना 2022- 23 करीता सर्वसाधारण योजनेत 236 कोटी रुपये, आदिवासी उपयोजनेत 118 कोटी रुपये, तर अनुसूचित जाती उपयोजनेत 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. त्यापैकी 67 कोटी रुपयांचा निधी सर्वसाधारण योजनेत प्राप्त झाला आहे. आदिवासी उपययोजनेत 34 कोटी रुपये, तर अनुसूचित जाती उपयोजनेत 4 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर कार्यान्वयीन यंत्रणांनी तांत्रिकी मंजुरी घेवून प्रशासकीय मान्यतेसाठी तातडीने प्रस्ताव सादर करावेत. विकास कामांचे प्रस्ताव सादर करताना पायाभूत सुविधांवर भर देण्यात यावा, त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत नियमितपणे आढावा घ्यावा. जनावरांवरील लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला निधी उपलब्ध करून दिला आहे. पशुसंवर्धन विभागाने तातडीने उपाययोजना करीत जनावरांवरील लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात. अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झालेले बंधारे संबंधित विभागांनी तातडीने दुरुस्त करावेत, प्रत्येक विभागाने कामांचा दर्जा उतकृष्ट ठेवावा. अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्यात. तसेच प्रत्येक तालुक्यात आमदार निधीतून एक शववाहिका देण्याचा प्रस्ताव असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

          यावेळी झालेल्या चर्चेत खासदार डॉ. हिना गावित, आमदार किशोर दराडे, आमदार जयकुमार रावल, आमदार काशिराम पावरा, आमदार मंजुळाताई गावित, आमदार डॉ. फारुक शहा आदींनी भाग घेतला. त्यांनी कमी पाऊस झालेल्या भागात पिण्याच्या पाण्याचे आतापासूनच नियोजन करावे, दुष्काळाचे लाभ मिळावेत, तापी काठावरील 17 गावांचे पुनर्वसन मार्गी लावावे, काबऱ्या खडक प्रकल्पाची दुरुस्ती करावी, अनेर अभयारण्य घोषित होण्यापूर्वी वसविलेल्या वाड्या पाड्यांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, धुळे शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, वीज वितरण कंपनीच्या कामांसाठी निधी मिळावा, शाळांना वीज उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

जिल्हाधिकारी  शर्मा यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले, सर्वसाधारण योजनेत आतापर्यंत 6 कोटी 40 लाख रुपये किमतीच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता दिली असून 4 कोटी पाच लाख रुपयांचा निधी वितरीत केला आहे. उर्वरित निधी विहित कालावधीत खर्चाचे नियोजन केले असून याबाबत वेळोवेळी कार्यान्वयीन यंत्रणांचा आढावा घेण्यात येत आहेत. जिल्हा वार्षिक योजनेत (सर्वसाधारण) सन 2021- 22 करीता शासनाने 210 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मार्च 2022 अखेर 209 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. खर्चाची टक्केवारी 99.90टक्के आहे, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती हटकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. यावेळी लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे प्रमुख, शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update