Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर DPDC – येथील नियोजन भवन शेजारी बांधण्यात आलेल्या नवीन महसूल भवनची पाहणी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. यावेळी त्यांच्या समवेत ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक संजय माळी, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्यासह महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागसह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पुन्नू चव्हाण खून प्रकरणी नीलू राठोड यास मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर
DPDC नवीन महसूल इमारत अत्याधुनिक व सर्व सोई सुविधानी युक्त असून, जिल्हाधिकारी कार्यालयासह अधिनस्त प्रमुख कार्यालये या नवीन महसूल भवनात लवकरच सुरू होणार आहेत. या नूतन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, फर्निचरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
यावेळी महसूल भवनातील सर्व दालनांची, अधिनस्त कार्यालयांची पालकमंत्री विखे पाटील यांनी पाहणी केली. DPDC यामध्ये जिल्हाधिकाऱी कार्यालय, पार्किंग व्यवस्था, कर्मचारी बैठक व्यवस्था, पाणी व्यवस्था, बैठक सभागृह आदि ठिकाणची पाहणी केली. DPDC तसेच या नवीन महसूल भवनांमध्ये उपलब्ध सुविधा तसेच येणाऱ्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी आवश्यक सूचना दिल्या.
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143