Drainage line laying work started
Maharashtra

कॅनरा बँक कॉलनी येथे ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ, काम करणाऱ्या नगरसेवकांच्या पाठीशी उभे रहा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

सोलापूर – प्रभाग ५ बाळे, शिवाजीनगर येथील कॅनरा बँक कॉलनी येथे ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ माजी पालकमंत्री आ.विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक डॉ.किरण देशमुख, नगरसेवक विक्रांत (मुन्ना) वानकर, नगरसेविका स्वातीताई आवळे, मराठा क्रांती मोर्चाचे समनव्यक किरण पवार व स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आला.

हे वाचा- राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने साजरी केली रिमांड होम मधील वंचित मुलांसोबत दिवाळी

या भागामध्ये पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे व या भागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न आम्ही सोडविलेला आहे. आज ड्रेनेज लाईनचे काम सुरू होत आहे व ते कामही लवकरात लवकर पूर्ण होईल व येणाऱ्या काळात आपल्या संपूर्ण समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. महापालिका निवडणुकिमध्ये काम केलेल्या नगरसेवकांच्या पाठीशी आपण उभे राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते समाधान आवळे व राजाभाऊ आलूरे यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते समाधान आवळे, राजाभाऊ आलूरे, विनय ढेपे, राजू पवार, बापु नवगिरे, देविदास पवार, आकाश पाटणकर, बाबर, गरड, कोळी, गायकवाड ताई, गुडडा मॅडम व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com