Solapur City

ऐन उन्हाळ्यात जोडभावी पेठेतल्या स्मार्टसिटीच्या रस्त्यावर पिण्याचे पाणी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- जोडभावी पेठ हद्दीतील गोलचावडी भागात पुन्हा लाखो लिटर पाणी वाया जात आहे. एकीकडे पाण्याची वणवण आणि दुसरीकडे कोरोनामुळे हाताला काम नाही पण गोल चावडीच्या स्मार्ट सिटी भागात बेजबाबदार कामामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहत आहे. रस्त्यावर पिण्याचे पाणी आहे की गटारीचे हे कळणे नामुष्की झाली आहे. प्रश्नाकडे दोनवेळा नगरसेवकांनी लक्ष देऊन बंद केले पण पुन्हा पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. एका महिन्यापूर्वी आयुक्तांच्या आदेशानुसार पालिका अतिरिक्त आयुक्तांनी याभागात पाहणी केल्याने त्या भागातील अनधिकृत नळ व रस्त्यावर पाणी सोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली होती. परंतु स्मार्टसिटीच्या अर्धवट कामामुळे नळकनेक्शन जोडणीही अर्धवट करण्यात आले आहे. लवकरच यावर तोडगा काढून नळजोडणी घरात करून रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्याचा उपाययोजना करण्याचे पालिका अतिरिक्त आयुक्त खोराटे, सहाय्यक आयुक्त सुनिल माने यांनी आदेश दिले होते. परंतु आयुक्तांच्या व नगरसेवकांच्या पत्राला स्मार्टसिटीच्या सीईओनी केराची टोपली दाखवली आहे. या भागात अनेक काम निकृष्ट दर्जेचे काम झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून कोणतीच अंमलबजावणी न झाल्याने पुन्हा पाणी वाया जात असल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांवर दंडात्मक कारवाई करूनही भागातील नागरिकांचे नळ घरात न घेतल्याने नागरिक रस्त्यावर कपडे घुवणे, गाडी धुवणे, विनाकारण रस्त्यावर पाणी सोडणे सुरूच ठेवले आहेत. तिन दिवसात म्हणजे पुढील पाणीपुरवठा वेळी जर यावर उपाययोजना न झाल्यास भागातील नागरिकांना घेऊन पालिका आयुक्तांकडे किंवा विभागीय कार्यालय 3 व स्मार्टसिटीच्या कार्यालय मध्ये सदरच्या रस्त्यावरील पाणी घेऊन संबंधितांवर किंवा कार्यालयाच्या आवारात पाण्याचा अभिषेक करण्याचा इशारा नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिले आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143