Drone survey of 10 villages in South Solapur
Maharashtra Technology

दक्षिण सोलापूर तालुक्यातील 10 गावांचे होणार ड्रोनद्वारे भूमापन; उपअधीक्षक भूमी अभिलेख गिडमणी यांची माहिती

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- गावांच्या जागेतील शेत जमिनी सोडून (महानगरपालिका/नगरपालिका/नगर पंचायत यापूर्वी गावठाण भूमापन झालेल्या गावांचे क्षेत्र वगळून) गावठाणातील जमिनींचे (मिळकतीचे) ड्रोनद्वारे भूमापन (मोजणी) करण्यात येणार आहे. सर्व्हे ऑफ इंडिया, ग्रामविकास विभाग आणि भूमी अभिलेख विभाग यांच्यातर्फे दक्षिण सोलापूर तालुक्यातील 10 गावांच्या गावठाणांचे 23 ऑगस्ट 2021 पासून ड्रोनद्वारे भूमापन होणार असल्याची माहिती उपअधीक्षक भूमी अभिलेख टी.एल. गिडमणी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

हे वाचाआपला प्रभाग आपली जबाबदारी या अंतर्गत युवा नेते प्रवीण वालेंनी केले जनजागृती

            ड्रोनद्वारे गावठाणांचे भूमापन हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून याचा ग्रामस्थांना फायदा होणार आहे. सर्वेक्षण करून प्रतिमांचे भूसंदर्भीकरण आणि भूमीकरण करण्यात येणार आहे. यानुसार ड्रोनद्वारे गावठाण मोजणीअंती प्राप्त नकाशाचे अभिलेख अद्ययावत करून उतारे तयार करण्यात येणार आहेत. सर्व हितसंबंधित ग्रामस्थांनी आपल्या मिळकतीचे स्थळ निश्चित करण्यासाठी पुराव्याच्या कागदपत्रासह प्रत्यक्ष मिळकतीच्या ठिकाणी उपस्थित रहावे. आपल्या अनुपस्थितीमध्ये स्थानिक चौकशी आणि प्रत्यक्ष जागेवरील उपलब्ध माहितीद्वारे कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही गिडमणी  यांनी सांगितले आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com