economy afloat in the Corona crisis
Maharashtra

कोरोना संकटात अर्थचक्र गतिमान ठेवणाऱ्या उद्योजकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई-  संपूर्ण देश कोरोनाच्या संकटात असताना उद्योजकांनी नेटाने अर्थचक्र सुरु ठेवले. अनेक उद्योगांनी कामगारकपात तसेच वेतनकपात न करता दुपटीने काम केले. कोरोनासारखी संकटे येतात. मात्र सर्वांनी अंतःकरणपूर्वक काम केले तर देशाला कुठल्याही संकटावर मात करता येईलअसे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.  कोरोना काळात अर्थचक्र गतिमान ठेवणाऱ्या राज्यातील ५१ उद्योजकांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि.२३) राजभवन येथे सत्कार करण्यात आलात्यावेळी ते बोलत होते.मुंबई तरुण भारत तर्फे आयोजित या कोविड योद्धा उद्योजक सन्मान’ सोहळ्याला मुंबई तरुण भारतचे मुख्य संपादक किरण शेलार व व्यापार पणन प्रमुख रविराज बावडेकर व्यासपीठावर उपस्थित होते. 

हे वाचाएकलव्य अकादमीच्या गुणवंत खेळाडूंचा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते गौरव

कोरोनाकाळात देशात स्वच्छतासेवकवॉर्डबॉयडॉक्टर्सनर्सेसपोलीसअशासकीय संस्थाशासकीय अधिकारीउद्योजक आदी सर्वांनी स्वयंप्रेरणेने काम केले. अंतःकरणापासून केलेल्या चांगल्या कामामुळे आत्मिक समाधान लाभते व त्याहीपेक्षा जनसामान्यांचे आशीर्वाद मिळतात असे सांगून कोरोना संपला असे न समजता प्रत्येकाने भविष्यातही सावधगिरी बाळगावी अशी सूचना राज्यपालांनी केली.  राज्यपालांच्या हस्ते बिपीन शाहडॉ कविता खडकेकुशल देसाईवैशाली बोथरामहेश खेडकरप्रबोध ठक्करएस. गणपतीमिलिंद संपगावकरप्रवीण पोहेकरसंजय दुबेसचिन शिंदेआदींचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी सन्मानित उद्योजकांची गौरवगाथा असलेल्या ग्रंथाचे देखील राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143