fbpx
Economy right clean drinking water

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

आरवट येथील विकास कामांसाठी आमदार निधीतून २५ लाख रुपयांचा ‍निधी

चंद्रपूर Economy – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पनेतील देश घडविण्यासाठी सामान्‍य माणसांच्‍या प्राथमिक गरजांची पूर्तता करणे आवश्‍यक आहे. त्‍याचाच एक भाग म्‍हणजे 21 व्‍या शतकात पिण्‍याच्‍या शुध्‍द पाण्‍यावर सर्वांचा अधिकार असला पाहिजे, असे प्रतिपादन  वने व सांस्कृतिक कार्य मंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी केले. गणेश उत्‍सवाच्‍या पवित्र दिवशी आरवट येथे आरो मशीनचे उद्घाटन होत असल्‍याचा आनंद असून नागरिकांना सुखसमाधानयशभरभराटी लाभो, अशा शुभेच्‍छा सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्‍या.

Economy चंद्रपुर तालुक्यातील आरवट या गावी वित्त आयोगाच्‍या निधीतून मंजूर शुध्‍द पाणी देणा-या आरो मशीनचे उद्घाटन मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. Economy तसेच यावेळी त्यांनी  25 लक्ष रूपयांच्‍या निधीतून विविध विकासकामांची घोषणा केली. मंचावर  देवराव भोंगळेसरपंच सुलभा भोंगळेउपसरपंच अलका कवठेनामदेव डाहूलेब्रिजभूषण पाझारेराहूल पावडेप्रज्‍वलंत कडूसुरज पेदुलवारविकास जुमनाकेमाजी सरपंच वंदना पिंपळशेंडेरणजित डवरेसंवर्ग विकास अधिकारी आशुतोष सपकाळसचिव रंजना मुळेबबन क्षीरसागर आदी उपस्थित होते.

कोल्हापूर विमानतळच्या नवीन टर्मिनल बिल्डिंगचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करा

          शिक्षणाच्‍या माध्‍यमातून महापुरूषांच्‍या विचारांचा आपण अंगीकार केला पाहिजे, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला वाघिणीचे दुध म्‍हटले आहे. Economy महात्‍मा फुलेंनी ‘विद्ये विना मती गेली’ असे तर महात्‍मा गांधी यांनी पुस्‍तक जगातला सर्वात चांगला मित्र आहे, असे म्‍हटले आहे. Economy आरवट या गावात शिक्षणाची उत्तम सुविधा निर्माण होण्‍याकरीता जिल्‍हा परिषद शाळेच्‍या माध्‍यमातून कार्य करण्‍यात येईल.

 गावातील विकासकामांमध्‍ये लहान मुलांसाठी खेळणीबंदिस्‍त नाली तसेच इतर कामांना पहिल्‍या टप्‍प्‍यात माझ्या स्‍थानिक विकास निधीतून 25 लक्ष रूपये मंजूर करून  कामे तात्‍काळ सुरू करण्‍यात येतील. Economy तसेच शेतीशिक्षणजलसंधारणआरोग्‍रोजगार या क्षेत्रामध्‍ये सुध्दा कामे करण्‍यात येईल. आरवट येथील भजन मंडळाला नवीन साहित्‍य उपलब्‍ध करून देण्‍यात येईल. राज्यामध्ये नवीन सरकार येताच नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना 50 हजार रूपये अर्थसहाय्य देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला असल्याचे मुनगंटीवार म्‍हणाले. Economy यावेळी मुनगंटीवार यांची मंत्रिपदी नियुक्ती झाल्याबद्दल गावक-यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update