Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर Education – सोलापुरातील म. न. पा. मराठी मुलांची शाळा क्रमांक-6 येथील प्राथमिक विद्यार्थ्यांना वह्या व विविध शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी प्राथमिक विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक Education साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री वंजारे व मार्गदर्शन मा. व. पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट सरांनी यांनी” महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा उपक्रम सद्गुरु बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे काम प्रशंसनीय असून शाळेतील शिक्षण उच्च दर्जाचे असून , सर्व विद्यार्थ्यांनी मोठे ध्येय ठेवण्याचे व अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगावे “असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका अश्विनी लांबतुरे यांनी मानले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मा. व. पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट त्यांचे सहकारी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी लांबतुरे सहशिक्षक आनंद सामल, उमेश युवनाती, स्वाती फुटाणे व सद्गुरु संस्थेचे अध्यक्ष भाग्यश्री वंजारे, कार्याध्यक्ष-तुकाराम द्यावरकोंडा, संस्थेचे सदस्य अश्विनी जाधव, श्रुतिका गाजूल हे उपस्थित होते.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143