fbpx
Education in Progress of students

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई Education – देशाने ‘नवीन शैक्षणिक धोरण 2020’ चा अवलंब केला असून या धोरणामुळे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती होईल. असे मत केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले. शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत पवई येथील ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन आज करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसखासदार पूनम महाजनखासदार मनोज कोटकएल अँड टी चे अध्यक्ष ए.एम नाईकसीईओ एस.एम. सुब्रमण्यमचेरिटेबल ट्रस्टचे जिग्नेश नाईकप्राचार्य मधुरा फडकेशिक्षक आदी उपस्थित होते.

सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देणार

Education  मंत्री शाह म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण बहुआयामी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा लाभ होणार आहे. शिक्षकांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे मानवतावादीआध्यात्मवादी विचार देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांचा मनात रुजवावेत. एक उत्तम शिक्षक कसा असावायांचा बोध घ्यायला हवा. शिक्षकांनी  बालकांना समाजातील उत्तम नागरिक बनवावे. पंचतंत्र सारख्या बोधकथांच्या माध्यमातून विद्यार्थी घडवावेत, असेही आवाहन शाह यांनी केले.भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी एल अँड टी ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अशा या राष्ट्रनिर्माण कार्यात ए. एम. नाईक यांचे योगदान महत्त्वाचे असल्याने भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण या नागरी पुरस्काराने गौरविले आहे. Education आता नाईक यांनी पायाभूत सुविधांसोबतच व्यक्तिनिर्माण करुन राष्ट्रनिर्माण करावे, अशा शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणालेनवीन शैक्षणिक धोरणामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबर त्यांचे चांगले चारित्र्य निर्माण होणार आहे. या धोरणामुळे समाजातील सर्व वर्गातील व्यक्तींना समान संधी उपलब्ध होतील. Education  विद्यार्थी हे हिऱ्यासारखे मौल्यवान असून त्यांना पैलू पाडण्याचे कार्य शिक्षक करतात, असे सांगून शिक्षक दिनानिमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update