Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापुर Education – प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठसमोर झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश प्राप्त झाले आहे. दुपारी 12 वाजताच्या सुमारास परीक्षेतील जाचक अटी रद्द कराव्या या मागणीसाठी शेकडो विद्यार्थी विद्यापीठासमोर आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते. काही दिवसांपूर्वी वस्तूनिष्ठ पद्धतीने परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. मात्र वस्तूनिष्ठ आणि सरळ पद्धतीने परीक्षा घेत असताना विद्यापीठाने जाचक अटी लावल्या होत्या. या अटी रद्द करण्याची मागणी आंदोलक विद्यार्थ्यांची होती. प्रहारच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला विविध संघटनानी पाठिंबा देखील दिला.
Education सुरुवातीला विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन करणारे विद्यार्थी आक्रमक झाले. यावेळी गेट ढकलून विद्यार्थी थेट विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारती समोर पोहोचले. भर पावसात विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत विद्यापीठाचा निषेध व्यक्त केला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्यावतीने शिष्टमंडळाने विद्यापीठ प्रशासनाची भेट घेतली. Education परीक्षेतील जाचक अटी रद्द करण्याची मागणी यावेळेस शिष्टमंडळने केली. विशेष म्हणजे या सर्व आंदोलनाची माहिती शिवसेनेचे नेते मनीष काळजे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना दिली.
हे वाचा – क्रिकेटरपासून अंपायरपर्यंत सगळंच बोगस – पहा नेमके काय आहे प्रकरण
Education मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील तात्काळ दखल घेत विद्यापीठ प्रशासनाला तात्काळ निर्णय घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार परीक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीनेच होणार असली तरी A, B, C, D, E, Fअशा सेट पद्धतीने न घेता सर्वांसाठी एकच प्रश्नपत्रिका असेल. परीक्षेसाठी एक तास ऐवजी विद्यार्थ्यांना आता दीड तास मिळेल. परीक्षानंतर प्रश्नपत्रिका देखील विद्यार्थ्यांना परत दिली जाईल. Education असे निर्णय विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आले. Education आंदोलनानंतर विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत उपस्थित विद्यार्थी आणि संघटनांच्यावतीने करण्यात आले. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ म्हस्के, शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी, शहर संपर्कप्रमुख जमीर भाई शेख, शिवसेनेचे नेते मनीष काळजे, विद्यार्थी संघर्ष समितीचे केशव इंगळे, टायगर ग्रुपच्या कविता चव्हाण इत्यादी उपस्थित होते.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143