Solapur City News 6
Maharashtra

सक्षम सामाजिक संस्थेने केले शैक्षणिक साहित्याचे वाटप

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- आजचे विद्यार्थी हे भारताचे भावी शिलेदार असून त्यांच्याच हाती राष्ट्राचे भवितव्य असल्याने त्यांना उत्तम ज्ञान मिळावे कारण शिक्षण हे समाज परिवर्तन मूळ गाभा घटक आहे व ज्ञानातून परिवर्तन घडण्यास मदत होते असे प्रतिपादन सक्षम सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष सचिन हुंडेकरी यांनी शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम प्रसंगी केले. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त सो.म. पा शाळा नं. 29 या शाळेतील गरजू व होतकरू 85 विद्यार्थाना मित्र सहभागातून शैक्षणीक साहित्याचे वाटप करण्यात आले.

कोरोना मुळे लॉक डाऊन झाल्या कारणाने बऱ्याच लोकांच्या हाताला काम नाही अशा परिस्थितीमध्ये मुलांना शिक्षण घेण्यासाठी मुलांना खूप अडचणी येत आहेत. आशा मुलांना शिक्षणाची गोडी लावणाऱ्या शाळेतील शिक्षकांचे व सक्षम संस्थेच्या या योगदाना बद्दल कौतुक मा. सुशील सरवदे यांनी केले. या प्रसंगी मा. सुशील  सरवदे, मा. अनिल  बुरांडे, मुख्याध्यापक श्री गणेश धनवटे सर, श्री. लक्ष्मण पुजारी सर , मा. सोनकांबळे, सक्षम संस्थेचे अध्यक्ष मा. प्रशांत हिबारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

              सदर साहित्य संकलना व कार्यक्रम यशस्वी तेसाठी  अविनाश हिंगणे, सचिन शिंदे, अनिकेत मडखंबे, बुध्दरक्षित गायकवाड, तैफिक पटेल, रोहित माने, तात्या शिंदे, गोपाळ पवार, प्रेम लालसरे यांनी यशस्वी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अर्चना मसाळ यांनी केले तर आभार अरुण डोके यांनी मानले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com