Health Solapur City

म्‍युकोरमायकॉसिस या बुरशीजन्‍य संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रभावी उपाययोजना करा – आ. विजयकुमार देशमुख

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

आ. विजयकुमार देशमुख म्‍युकोरमायकॉसिस या बुरशीजन्‍य संसर्गाच्या रूग्णासाठी स्वतंत्र कक्षाची केली मागणी

सोलापूर- म्‍युकोरमायकॉसिस या बुरशीजन्‍य संसर्गाचे गंभीर रूग्‍णाच्या संख्येत. राज्‍यभरात वाढ झाल्‍याचे निरीक्षण डॉक्‍टरांनी नोंदविले आहे. अशा वेळी रूग्‍णाने सतर्क राहत वेळीच निदान आणि उपचार घेणे गरजेचे आहे. यासंदर्भातील प्रतिबंधात्‍मक इंजेक्‍शन्‍स महागडे आहे, शस्‍त्रक्रियेचा खर्च देखील सर्वसामान्‍य नागरिकांच्‍या आवाक्‍या बाहेरचा आहे. त्‍यामुळे या बुरशीजन्‍य संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना कराव्‍यात,विशेषतः ॲम्‍फोटरसीन –बी हे इंजेक्‍शन प्रतिबंधक इंजेक्‍शन कमी किंमतीत उपलब्‍ध करावे तसेच गोरगरीब रूग्‍णांच्‍या सोयीच्‍या द़ष्‍टीने या उपचाराचा समावेश महात्‍मा ज्‍योतीबा फुले जनआरोग्‍य योजनेत करण्‍याची मागणी . माजी आरोग्य राज्यमंत्री व आमदार विजयकुमार देशमुख यांनी राज्‍य शासनाला केली आहे.
यासंदर्भात राज्‍यपाल,मुख्‍यमंत्री,आरोग्यमंत्री, आरोग्‍य विभागाचे प्रधान सचिव यांना पाठविलेल्‍या पत्रात आ. विजयकुमार देशमुख यांनी ,नमुद केले आहे की, रोगप्रतिकारशक्‍ती कमी झाल्‍यामुळे ब-या झालेल्‍या कोविड रूग्‍णांमध्‍ये हा दुर्मिळ संसर्ग आढळत आहे. कोरोनाच्‍या पहिल्‍या लाटेच्‍या तुलनेत या लाटेत म्‍युकोरमायकॉसिस या बुरशीजन्‍य आजाराचे रूग्‍ण वाढले आहेत. याचा म़त्‍युदर हा 54 टक्‍के असुन वेळेवर उपचार घेतल्‍यास आजारातुन बाहेर पडता येते. नाकावाटे ही बुरशी डोळे आणि मेंदुकडे वाढत जाते. लवकरात लवकर निदान झाल्‍यास इंजेक्‍शनच्‍या माध्‍यमातुन उपचार करता येतात.
             या बुरशीच्‍या संसर्गाचा वेग सर्वाधीक असुन उपचारासाठी वेळ कमी मिळतो. लवकर निदान झाले तर इंजेक्‍शन द्वारे उपचार शक्‍य होतो. जर उशीर झाला तर शस्‍त्रक्रिया करण्‍याची वेळ येते. डोळयांपाशी संसर्ग पोहचल्‍यास त्‍यांना कायम स्‍वरूपी इजा होण्‍याची शक्‍यता असते. अनेक रूग्‍णांचे डोळे यामुळे काढले गेले आहेत. हा संसर्ग मेंदु पर्यंत पोहचल्‍यास उपचार करणे दुरापास्‍त होते व रूग्‍णांचा मृत्‍यु होतो. यासाठी ॲम्‍फोटरसीन –बी हे इंजेक्‍शन प्रतिबंधक इंजेक्‍शन आहे. याची किंमत 1500 ते 1700 रूपये इतकी आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांना अनेक इंजेक्शनची आवश्यकता असते त्यामुळे त्यांचा खर्च सर्वसामान्‍य गरीब रूग्‍णाला परवडणारा नाही व एकुणच भारतात ह्या इंजेक्‍शन्‍सचा साठा संपल्‍याची मा‍हिती आहे. या इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या सुरू आहे हा काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावी काळाबाजार रोखल्यास पुरेशा प्रमाणात इंजेक्‍शन्‍सचे उत्‍पादन वाढवल्यास इंजेक्शन मोठया प्रमाणावर उत्पादन करून कमी किंमतीत हे इंजेक्‍शन उपलब्‍ध होणे आवश्‍यक आहे.कारण या पुढच्‍या टप्‍प्‍यात जर शस्‍त्रक्रिया करावी लागली तर त्‍याचां खर्च किमान दिड ते दोन लाख असल्‍यामुळे सर्वसामान्‍य गरीब रूग्‍णाला ते परवडणारे नाही. या बुरशीजन्‍य आजाराचा संसर्ग रोखण्‍याच्‍या दृष्‍टीने मार्गदर्शक तत्‍वांमध्‍ये बदल करणे अत्‍यंत गरजेचे आहे. या आजारासाठी स्वतंत्र पक्षाची निर्मिती होणे आवश्यक आहे शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक हॉस्पिटला या आजारात संदर्भात नियमावली तयार करून देणे गरजेचे आहे. त्‍याचप्रमाणे उपचारादरम्‍यान ॲन्‍टी फंगल औषधे रूग्‍णांना देण्‍याची आवश्‍यकता आहे. प्रामुख्‍याने हाय रिस्‍क असलेल्‍या रूग्‍णांमध्‍ये हा संसर्ग आल्‍यास धोका जास्‍त आहे. त्‍यातही ऑक्‍सीजन पाईपलाईन, सिलेंडर यात हा जंतु गेल्‍यास त्‍याचा प्रादुर्भाव आणखी वाढण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यादृष्‍टीने सुध्‍दा उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. विशेषतः गोरगरीब नागरिकांच्‍या सोयीच्‍या द़ष्‍टीने यासंदर्भातील उपचाराचा खर्च महात्‍मा ज्‍योतीबा फुले जनआरोग्‍य योजनेत समाविष्‍ठ करणे गरजेचे आहे. त्‍यामाध्‍यमातुन मोठया प्रमाणावर गरीब रूग्‍णांना मोठया प्रमाणावर लाभ मिळेल.
                   कोरोनाचे संकट मोठे आहे मात्र त्‍यानंतर सुध्‍दा या बुरशीजन्‍य आजाराच्‍या माध्‍यमातुन रूग्‍णांच्‍या जिवाला धोका आहेच. त्‍यादृष्‍टीने प्रतिबंध घालण्‍यासाठी शासनाने तातडीने पावले उचलत वरील प्रमाणे उपाययोजना करण्‍याची आवश्‍यकता असल्याच आमदार देशमुख म्हणाले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com