Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापुर- रुग्णसेवेसारखं पवित्र काम जगात दुसरे नाही या उदात्त हेतूने संपूर्ण राज्यात गोरगरीब रुग्णांना सर्वोतोपरी मदत करण्याचे कार्य महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटना अविरतपणे करत आहे,संघटनेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून राज्यातील गोरगरीब रुग्णांना शासकीय योजना तसेच खाजगी संस्थेच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ मिळवून देण्यासोबतच विविध आरोग्य आणि रक्तदान शिबीर आयोजित करण्याचे महत्कार्य संस्थेच्या वतीने केल्या जात आहे,सोलापूर येथील रुग्णसेवक तथा सामाजिक कार्यकर्ता आनंद गोसकी यांच्या रुग्णसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण भोटकर यांनी घेतली असून सोलापूर जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना मदतीचा हात देण्यासाठी रुग्णसेवक आनंद गोसकी हे सदैव तत्पर असतात आनंद गोसकी यांची सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आनंद गोसकी हे रुग्णसेवक असून त्यांना सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नुकतेच गौरविण्यात आले होते,आनंद गोसकी अध्यक्ष असलेल्या जनआधार फाउंडेशन कडून कोरोना संकटात मास्क,सॅनिटाइझर आणि दोन वेळचे जेवण घरोघरी वाटप करण्याचे महत्कार्य आनंद गोसकी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते त्या कार्याची दखल घेऊन उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी शासनाकडुन सन्मानपत्र आनंद गोसकी यांना प्रदान केले होते, कोरोनाच्या काळात पोलिसांनकडुनही आनंद गोसकी यांचा सन्मान करण्यात आला.दिल्ली येतील प्रबुध्द रत्न पुरस्कार ही त्यांना सन्मानित करण्यात येतोय आनंद गोसकी यांच्या सारख्या तरुणांनी पुढे येऊन गोरगरीब रुग्णांची सेवा करावी आणि एक आदर्श निर्माण करावा असा आशावाद व्यक्त करून आनंद मधुकर गोसकी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याचे महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण भोटकर यांनी नियुक्ती पत्रात नमूद केले आहे ,आनंद गोसकी या तरूणाकडे अनेक गरीब रूग्णाना जातीने स्वत: रूग्णाच्या नातेवाईकांनसोबत मुंबई पुण्यासारख्या शहरात मोफत शासकीय योजनेतुन व ईतर संस्थानकडुन मदत मिळवुन आॅपरेशनसाठी आनंद गोसकी या युवकाने भाग पाडले, आनंद गोसकी यांच्या निवडीमुळे एका सच्चा रुग्णसेवकाला या पुढे आणखी चांगले काम करण्याची संधी उपलब्ध झाली असून सर्वच स्तरातून आनंद गोसकी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143