Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर Election Card – मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्याची मोहीम सुरू आहे. येत्या 16 ऑक्टोबर 2022 (रविवारी) रोजी मतदान कार्डाशी आधारकार्ड जोडणीच्या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त मतदारांनी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
Election Card आधारकार्डाशी मतदान कार्ड जोडणी अनिवार्य नसून ऐच्छिक आहे. मात्र मतदारांनी त्यांच्या रहिवासाविषयी आवश्यक पुरावे जसे पासपोर्ट, वीज बील, कर पावती यापैकी एक पुरावा देणे आवश्यक आहे. आधारकार्ड जोडणीसाठी मतदारांनी उत्स्फूर्तपणे पुढे यावे.
खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्या आणि डिजिटल वृत्त प्रकाशकांनी सट्टेबाजांची जाहिरात लावल्यास होणार कारवाई
Election Card आपला आधार क्रमांक गुप्त ठेवला जाईल. जिल्ह्यातील मतदारांनी मोहिमेमध्ये सहभागी होऊन आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे आपला आधार क्रमांक देवून मतदार क्रमांकाशी जोडून घ्यावा, असे आवाहन शंभरकर यांनी केले आहे.
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143