election-corporators-joined-ncp
Election

Election : भुसावळमध्ये भाजपला मोठे खिंडार; 30 नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

जळगाव Election – विधान परिषदेच्या निवडणुकीत सहा पैकी 4 जागा जिंकून भाजपने महाविकास आघाडीला धक्का दिला. पण, आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा बालेकिल्ल्याला मोठे भगदाड पाडले आहे. भुसावळमध्ये भाजप नगराध्यक्षांसह 30 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. भाजपला हा मोठा हादरा माणला जात आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. भुसावळच्या भाजप नगराध्यक्षांसह 22 नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे.

Election  एवढंच नाहीतर सावदा नगरपरिषदेच्या भाजप नगराध्यक्षा अनिता येवले यांच्यासह 8 नगरसेवक सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी या नगरसेवकांसह अनेक पक्षाचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा अजित पवार यांच्या उपस्थितीतच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीत झालेल्या मेगाभरतीमुळे चैतन्याचं वातावरण आहे. तर दुसरीकडे भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून भाजपला मोठी गळती लागली आहे. जळगावमध्ये महिना-दोन महिन्यांनी भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे. जळगावच नाहीतर राज्यभरात ठिकठिकाणी भाजपचे नगरसेवक आणि नेते राष्ट्रवादीत Election प्रवेश करत आहे.नांदगावात सुद्धा राष्ट्रवादीचा भाजपला धक्का

तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्येही भाजपला मोठा धक्का बसला आहे. नांदगावचे माजी आमदार संजय पवार यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत येवल्यात हा प्रवेश सोहळा पार पडला. पवार यांनी त्यांच्या समर्थकांसोबत मनगटावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले आहे. यावेळी मालेगाव तालुक्यातील देखील काही भाजपच्या कार्यकर्त्यानी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी माजी आमदार पंकज भुजबळ,जिल्हा अध्यक्ष रविंद पगारसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com