Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
भक्ती, युक्ती आणि शक्ती असे त्रिवेणी संगम असणारे सुरेश पाटील हे महापालिकेतील ढाण्या वाघ- श्रीमती छायाताई खंडाळकर सोलापूर Election-आपल्या प्रभागाचा नव्हे तर संपूर्ण सोलापूर शहरातील नागरिकांच्या अडीअडचणी व मूलभूत सुविधा सोडविण्यात मध्ये सुरेश पाटीलांमध्ये धमक आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांनी विकासाच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला. असे मत भाजपाचे सरचिटणीस शशिकांत थोरात यांनी व्यक्त केले.
दरम्यान Election प्रभाग क्रमांक तीन मधील घोंगडे वस्ती भवानी पेठ सोना नगर परिसरातील सिद्धेश्वर भजनी मंडळ येथे सुरेश पाटील यांच्या वार्ड वाईज व भांडवली निधीतून रस्ता डांबरीकरण आणि फ्लेवर ब्लॉक कामाचे शुभारंभ रविवारी सायंकाळी करण्यात आले यावेळी श्रीमती छायाताई खंडाळकर, बाळासाहेब ओझा, मोहन कापसे, बाबुराव कलागते, विजय स्वामी अप्पू घोडके, बसवराज निम्बर्गी, पांडुरंग घाटे, शैलेंद्र मुनाळे, तुकाराम घाटे, सौ सुशीला आडेकर, पारूबाई घोडके, गंगुताई कोंपे, स्वामी आव्वा, कोटलगी आव्वा, सुनिता जाधव, सौ पिसाळ, सौ साळुंके आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा सत्कार यावेळी सुरेश पाटील मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले. आता निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहू लागले आहेत पावसाळ्याच्या छत्रीप्रमाणे मताचा जोगवा मागण्यासाठी काही लोक आपल्या पर्यंत येतील कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका विकास कामे करणाऱ्या व्यक्तीलाच आपण निवडून द्या असे प्रास्ताविकात भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी यावेळी म्हणाले.
राजकारणाच्या जोडिला सुरेश पाटील यांनी संस्कृती जपली, भक्ती युक्ती आणि शक्ती असे त्रिवेणी संगम विकासाभिमुख नेतृत्व असणारे सोलापूर महानगरपालिकेतील ढाण्या वाघ आहेत. असे मनोगत यावेळी श्रीमती छायाताई खंडाळकर यांनी व्यक्त केलं. यावेळी खास महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेजस पिसाळ, प्रकाश साळुंके, शरणू नांदणीकर, सोमनाथ पिसाळ, राजशेखर स्वामी, सिद्धेश्वर पाटील, सिद्धलिंगया स्वामी, शरणू जकापुरे, रिंकू नोगझा, भिकुसा कोल्हापुरे, शिव नागणसूरे,सुनील पिसाळ, विजय कोळी, नबीलाल तांबोळी, लोखंडे, मल्लिनाथ चोपडे,अप्पी पुजारी आदींनी परिश्रम घेतले तर सिद्धेश्वर भजनी मंडळ आणि गीता भजनी मंडळ भक्तगण यांचे सहकार्य लाभले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी रानसरजे यांनी केले तर आभार युवा नेते बिपीन पाटील यांनी मानले.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
****अधिक माहितीसाठी संपर्क ***
सुनिल कोडगी, संपादक
9503221143 / 9404151143