fbpx
election-right-to-vote-to-farmers

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचे केले अभिनंदन
सोलापूर Election- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाजार समितीमध्ये सर्वच शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. तत्कालीन सहकार तथा पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी भाजपच्या कार्यकाळात हा निर्णय घेतला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय रद्द केला होता. आता पुन्हा भाजप सेनेच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमदार सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केला केले असून शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे.

Train : 12169/12170  पुणे-सोलापूर – पुणे एक्सप्रेस दररोज धावणार

            Election बाजार समितीचा मुख्य कणा हा शेतकरीच आहे, हे ध्यानात ठेवून तत्कालीन सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी बाजार समिती निवडणुकीत सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमालाचा खरेदी-विक्री व्यवहार होत असताना संचालक मंडळामध्ये मात्र शेतकऱ्यांना कोठेही स्थान मिळत नव्हते. बाजार समितीचा शेतकरी हाच प्रमुख कणा असून त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात शेतकऱ्यांचे हित आहे, हे लक्षात घेऊन काही निकष लावून कालीन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला होता. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सातबाराधारक शेतकरी आणि साखर कारखान्यांच्या धर्तीवर जे शेतकरी बाजार समित्यांना शेतमाल पुरवठा करतात तेच मतदानाचे हक्क बजावतील. यामुळे बाजार समित्यांच्या कामकाजात मोठा बदल होईल,
                  Election शेतकऱ्यांच्या जिवावर समित्या चालतात त्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणारा प्रतिनिधी असावा या उद्देशाने आता सुभाष देशमुख यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे राज्यातील सर्वच शेतकऱ्यांनी स्वागत केले होते. यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याला बाजार समितीमध्ये संचालक म्हणून जाण्याची संधी मिळाली होती. मात्र 2019 मध्ये भाजपची सत्ता जाऊन महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर त्या सरकारने हा निर्णय रद्द केला होता याबद्दल शेतकऱ्यांनी रोषही व्यक्त केला होता. मात्र आता नव्याने आलेल्या भाजप सेनेच्या सरकारने कालीन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वच शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय पुन्हा घेतला आहे. या निर्णयाचे आमदार सुभाष देशमुख यांनी स्वागत केले असून अ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.

सरकारचा योग्य आणि स्वागताहार्य निर्णय: आमदार देशमुख
           शेतकऱ्यांच्या मालाला जर चांगला भाव पाहिजे असेल तर शेतकऱ्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी बाजार समितीमध्ये जाणे आवश्यक आहे. भाव न मिळाला तर शेतकरी संबंधिताला जाब विचारू शकतो. त्यामुळे बाजार समिती खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी काम करू शकते. त्यामुळे भाजप- सेना सरकारने घेतलेल्या हा निर्णय योग्य आणि स्वागतहार्य असल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update