Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
नवी दिल्ली Election – सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) ओबीसी आरक्षणाला (स्थगिती दिली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापलेलं पहायला मिळालं होतं. अशातच आता ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयानं मोठा निर्णय दिला आहे. 21 डिसेंबरला राज्यात नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. या निवडणुका स्थगित करण्याची मागणी सर्वच पक्षांकडून करण्यात आली होती. अशातच जाहीर झालेल्या निवडणुका स्थगित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी देखील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
येत्या 3 दिवसात राज्यात येणार थंडीची हुडहुडी सुरू होणार; हवामान खात्याची माहिती
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता येत्या 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपंचायतींच्या निवडणुका Election या ओबीसी आरक्षणाविनाच होणार आहेत. 27 टक्के ओबीसी आरक्षणाच्या जागा खुल्या प्रवर्गात करून निवडणुका घ्या तसेच निवडणूक आयोगाना निवडणुकीबाबत अध्यादेश काढावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, 27 टक्के जागांचे निकाल हे उरलेल्या 73 टक्के जागांच्या निकालावेळीच लावण्यात यावेत, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशानंतर आता ठाकरे सरकारच्या अडचणी वाढल्याचं दिसत आहे.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews