Solapur City

‘प्रिसिजन’च्या पुढाकाराने मोदी स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी कार्यान्वित

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

‘प्रिसिजन’च्या सीएसआर निधीतून सुशोभीकरणाचंही काम पूर्ण, सोलापूर महापालिकेकडे हस्तांतरण

सोलापूर- प्रिसिजन समूहाच्या पुढाकारातून मोदी स्मशानभूमीतील बंद असणारी पहिली विद्युतदाहिनी बुधवारी (दि. १९) कार्यान्वित झाली. प्रिसिजन कॅमशाफ्ट्सचे चेअरमन यतिन शहा यांनी सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांच्याकडे आज याबाबतचं हस्तांतरण पत्र सुपूर्द केलं. कोरोना महामारीमुळे सोलापूरात मृतांची संख्या वाढत असून फूटाफूटाच्या अंतरावर चिता रचाव्या लागत आहेत. इतकंच नव्हे तर अनेक मृतदेह वेटिंगवर ठेवावे लागत आहेत. ही वस्तुस्थिती सोलापूरातील माध्यमांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मांडली होती. या पार्श्वभूमीवर मोदी स्मशानभूमीतील पहिली विद्युतदाहिनी तत्काळ सुरू व्हावी असं आवाहन उपायुक्त पांडे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने केलं होतं. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने पुढाकार घेत प्रिसिजन समूहाने आपल्या सीएसआर निधीतून ही विद्युतदाहिनी कार्यान्वित केली आहे.

               विद्युतदाहिनीमध्ये नव्या कॉईल्स व नवा ब्लोअर बसविण्यात आला आहे. ट्रॉन्सफॉर्मरचीही दुरूस्ती करण्यात आली आहे. श्रद्धांजली सभागृहासह संपूर्ण स्मशानभूमीची रंगरंगोटी करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश मिळावा यासाठी नवे लाईट्स बसविण्यात आले आहेत. प्रवेशद्वारासमोरील पटांगणात चाफ्याची झाडं लावून सुशोभीकरण करण्यात आलं आहे. अस्थी गोळा करण्यासाठी कुंड्या ठेवण्यात आल्या असून आवश्यक ते माहितीफलकही लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे प्रिसिजनच्या टीमने अत्यंत वेगाने काम करत अवघ्या एक महिन्याच्या कालावधीत हे नूतनीकरण पूर्ण केलं. यासाठी यतिन शहा यांनी स्वतः वारंवार मोदी स्मशानभूमीला भेट देऊन कामाचा आढावा घेतला होता. या योगदानाबद्दल उपायुक्त पांडे यांनी प्रिसिजन समूहाचे आभार मानले. नूतनीकृत मोदी स्मशानभूमीचं पावित्र्य जपण्यासाठी सोलापूरकरांनीही महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं.

            हस्तांतरणावेळी प्रिसिजनचे वरिष्ठ अधिकारी प्रदीप महिंद्रकर व सिद्धेश्वर चंदनशिवे, जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे व आदित्य गाडगीळ, मोहसीन अत्तार, अस्लम कलादगी तसेच सोलापूर महानगरपालिकेचे झोनल ऑफिसर विजयकुमार लोखंडे, विद्युत विभागाचे राजेश परदेशी व परवेज शेख, मुख्य आरोग्य निरीक्षक सुधाकर नागटिळक यांच्यासह आरोग्य विभागाचे पूनम कांबळे, श्रीशैल हिंगमिरे, राजू डोलारे हे उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com