electric-solapur-bell-trains
Solapur City Environment

सोलापूरच्या घंटागाड्यांच्या इलेक्ट्रिक कन्व्हर्जनसाठी प्रिसिजन आणि महापालिका यांच्यात सामंजस्य करार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

सोलापूर- प्रिसिजनच्या १०० टक्के मालकीची नेदरलँड येथील सबसिडरी कंपनी “इमॉस” ही एक वैशिष्ठ्यपूर्ण व्यवसाय करते आहे. ज्यात ट्रक, बसेस आणि मिलिटरी वाहनांसाठी इलेक्ट्रिक (Electric) पॉवरट्रेन्सचे डिझाईन, विकास, आणि उत्पादन करून पुरवठा करण्याचे काम केले जाते. इमॉस या कंपनीने युरोपात आजवर ६०० हुन अधिक इलेकट्रीक वाहने वितरित केली आहेत. ज्यांनी १५० दशलक्ष किलोमीटर्सपेक्षा अधिक प्रवास केला आहे. प्रिसिजनने सदरचे तंत्रज्ञान आणि कौशल्य आता भारतात आणून यशस्वीरीत्या एक २३ आसनी संपूर्णतः रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस तयार केली आहे. या पहिल्याच बसच्या ड्राइव्हलाईनमध्ये जवळपास ६० टक्के भारतीय बनावटीचे उद्दिष्ट साध्य केले आहे. ARAI ने देखील याची चाचणी घेऊन प्रमाणित केली आहे. सोलापूर महानगर पालिकेकडे संपूर्ण शहरातील कचरा एकत्रित करण्यासाठी जवळपास २५० घंटागाड्या आहेत. (लाईट कमर्शियल व्हेइकल्स) या २५० घंटागाडयांना १०० टक्के इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये रूपांतरित करण्याचा “सोमपा”चा मानस आहे.

हे वाचा- शनिवार पासून सोलापूर-पुणे-सोलापूर सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस दररोज धावणार

         शहरातील कचरा गोळा करणाऱ्या घंटा गाड्यांचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका आणि प्रिसिजन यांच्या आज रोजी सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार प्रिसिजनने वर्ष २०२२ अखेरपर्यंत तीन नवीन रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक लाईट कमर्शियल व्हेईकल व्हेइकल्स मोफत बनवून द्याव्यात. ज्याचा वापर महापालिका घंटागाड्यांसाठी करेल. या गाड्यांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी प्रिसिजनने आवश्यक ती सेवा द्यायची आहे. या तीन गाड्यांच्या यशस्वी चाचणीनंतर महापालिकेच्या ताफ्यातील घंटागाड्यांचे संपूर्णतः इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये रूपांतर करण्यासाठी महापालिका ई – टेंडरिंग प्रक्रिया पूर्ण करेल. सोलापूर महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार या घंटागाड्यांचे रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये रूपांतर झाल्यानंतर इंधनावर होणारा वार्षिक साडेसहा कोटी रुपये इतका खर्च वाचेल आणि जवळपास १८०० टन कार्बन डायऑकसाईडचे होणारे उत्सर्जन वाचेल. शिवाय, रहिवाशी क्षेत्रात होणार आवाजाचा स्तरही लक्षणीयरित्या कमी होईल.
या इलेक्ट्रिक गाड्यांसाठी आवश्यक असणारी सुविधा आणि गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर्स आणि बाकी मनुष्यबळाला प्रशिक्षण देण्याची महापालिकेने जबाबदारी घेतली आहे. या गाड्यांच्या विकासासाठी प्रिसिजन आणि सोलापूर महानगरपालिका यांनी एकत्रितपणे परस्पर सहकार्याने कार्य करण्याचा निश्चय केला आहे.
या करारावर स्वाक्षरी करण्याच्या प्रसंगी सोलापूर महापालिकेच्या महापौर श्रीमती कांचना यन्नम आणि महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर, महापालिका सहाय्यक आयुक्त राम पवार व अन्य अधिकारी उपस्थित होते. तसेच प्रिसिजनचे चेअरमन यतिन शहा, पूर्णवेळ संचालक करण शहा आदी उपस्थित होते.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews