Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
नागपूर- शहरातील भीम चौकातील संत शिरोमणी कबीर बहुद्देशिय संस्थानाच्या वीज देयक भरणा केंद्रास मान्यता मिळाली असून आज या केंद्राचे उद्घाटन उर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते झाले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शासनाने महिला शिक्षक दिन म्हणून साजरी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुषंगाने केंद्रात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस डॉ. राऊत यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. विद्युत विभागाचे अधिक्षक अभियंता अमित परांजपे, कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे, उपविभागीय अभियंता एम.बी. चव्हाण, सहायक अभियंता अभिषेक ठाकूर, उपव्यवस्थापक रिता ठाकरे तसेच संत शिरोमणी कबीर बहुद्देशिय संस्थेचे अध्यक्ष शैलेश मेश्राम, सचिव नरेंद्र भालेराव, कार्याध्यक्ष शांताराम मेश्राम, कमलेश गौरखेडे, शालिनी बावनगडे, नलिनी गौरखेडे यावेळी उपस्थित होते.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143