news 14209
Economy Technology

लवकरात लवकर शहर जिल्ह्यातील पात्र मतदारांनी नाव नोंदणी करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून दि. 17 नोव्हेंबर, 2020 ते 15 ‍डिसेंबर 2020 या कालावधीत हरकती व दावे स्वीकारण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत ज्या मतदारांची मतदार म्हणून नोंदणी झाली नाही आणि ज्यांचे वय दि. 1 जानेवारी 2021 रोजी 18 वर्ष पूर्ण होत आहे त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट होणे आवश्यक आहे त्यांनी फॉर्म 6 भरुन द्यावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.

         मयत व स्थलांतरीत मतदार असतील त्यांचा शोध घेण्यात येऊन त्यांची नावे मतदार यादीतून कमी करावयाची आहेत. त्यासाठी फॉर्म 7 भरुन द्यावयाचा आहे. तसेच मतदार यादीत नाव, वय, लिंग या बाबी चुकीच्या नोंदविल्या असतील त्यामध्ये दुरुस्ती करावयाची आहे. यासाठी फॉर्म 8 भरुन द्यावयाचा आहे. या मोहिमेमध्ये मतदार यादी अचूक व निर्दोष होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी www.nvsp.in या पोर्टलचा वापर करता येईल. अधिक माहितीसाठी  1950 या टोल फ्री क्रमांकाचा वापर करता येईल. मतदार यादीत नवीन मतदारांची नावे समाविष्ट करणे अथवा नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी विहीत नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन, मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभागामार्फत करण्यात येत आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PMडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com