Electricity Solapur City

ऊर्जामंत्री नितीन राऊत मागासवर्गीय असल्यामुळेच अडचण

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

प्रकाश आंबेडकरांची बरामतीकरांवर केली टीका,
सोलापूर- कांग्रेस पक्षाचे आणि त्यातल्यात्यात   मागासवर्गीय मंत्री असल्यामुळेच वीज बिलाच्या प्रस्तावाला अर्थमंत्र्याकडून जाणीवपूर्वक अडचण निर्माण केली जात आहे नाहीतर थकीत वीजबिलाचा प्रश्न कधीच मार्गी लागला असता अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरात व्यक्त केली आहे.  वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते तेव्हा एका प्रश्नाला उत्तर देताना ॲड प्रकाश आंबेडकर हे बोलत होते. लाॅकडॉन काळातील थकीत वीज बिल शासनाने माप करावे अशी मागणी राज्यभरातून होत असताना राज्याच्या ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी थकीत बील माप करण्याच्या अनुषंगाने तसा प्रस्ताव मंत्रीमंडळात सादर केला असता राष्ट्रवादीचे नेते राज्याचे अर्थ मंत्री अजित पवार हे जाणीवपूर्वक ऊर्जामंत्र्यांच्या प्रस्तावाला अडचण निर्माण करत आहेत , राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे केवळ मागासवर्गीय मंत्री असल्यामुळेच बारामतीकर हे थकीत वीज बिलालाच्या प्रस्तावाल विरोध करत असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली . व्हाईस:::लाॅकडाऊन काळात वाढीव वीज युनिटच्या वाढीव दरा बाबत ट्राय कोर्टाकडून  सुनावणी होणे अपेक्षित आहे तसा कायदा असता देखील ठाकरे सरकारने वीज बिलाच्या युनिट दरात दुप्पटीने वाढ केली आहे , वीज युनिटचा दरात केलेली वाढ अगोदर सरकारने रद्द करावी अशी मागणी देखील यावेळी ॲड प्रकाश आंबेडकर यांनी केली . पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत मतदारांनी थकीत वीज बिलाच्या प्रस्तावाला विरोध करणा-या खोटारड्या मंत्र्याला त्याची जागा दाखवून द्या असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143